पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस देणार ‘मोदी गो बॅक’चा नारा

येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला पुणे महाापालिकेची निवडणूक होणार आहे.
BJp-Ncp
BJp-NcpSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रातील भाजपा सरकारकडून गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करण्यात येत आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून येत्या सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ‘मोदी गो बॅक’च्या घोषणा देत आंदोलन करण्यात येणार आहे.

BJp-Ncp
Maratha Reservation : संभाजीराजे हे फडणवीस सरकारला मॅनेज झाले होते?

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.ते म्हणाले, ‘‘ कोरोना काळातील पहिल्या लाटेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्राचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.गेल्या काही महिन्यात भाजपा नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अवमान होईल, अशी वक्तव्ये करण्यात आली आहेत.त्यावरची प्रतिक्रिया म्हणून मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्यावेळी आंदोलन करण्यात येईल.’’

BJp-Ncp
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे तीस नगरसेवक नाराज ; नेतेच ठेकेदार!

येत्या सहा मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासह विविध योजनांचे उद्घघाटन तसेच काही कामांचा शुभारंभ होणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याच्यावेळी राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.जगताप म्हणाले, ‘‘ महाराष्ट्रद्रोही भाजपा सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे.अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सहा मार्चला सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत ‘मोदी गो बॅक’ घोषणा देत आंदोलनात उतरावे.’’

येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्‍र्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ व काही विकासकामांची उद्धघाटने करत भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर सध्या राजकारण सुरू झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com