Lohagad Fort Ketan murder investigation details Sarkarnama
पुणे

Lohagad Fort Ketan Murder Case : नवीन पुराव्यांमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला वेगळे वळण; सियाचा भाऊ पोलिसांच्या रडारवर, नेमकं काय घडलं?

New evidence in Ketan Agarwal murder investigation : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नव्या पुराव्यांमुळे तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. सियाच्या भावावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले असून प्रकरणातील नव्या घडामोडी जाणून घ्या.

Rashmi Mane

Ketan Agarwal case shocking details: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहेत. आता या प्रकरणाला आणखी एक अनपेक्षित वळण मिळाले असून, आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याचे नाव नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. एका कायदेशीर नोटिशीमुळे या प्रकरणातील घडामोडींना वेग आला असून, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयल यांच्याविरोधात तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. साहिल यांनी केलेल्या काही कथित आरोपांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिमेला आणि सामाजिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.

या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड म्हणजे वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने केलेले विधान. न्यायालयात तिने आपले वकील आशुतोष श्रीवास्तव नसून अॅडव्होकेट विपुल दुशिंग असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. या विधानानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्यानंतरच श्रीवास्तव यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

नोटिशीत साहिल गोयल यांनी केलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे वकिली व्यवसायातील विश्वासार्हता आणि व्यावसायिक प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचे श्रीवास्तव यांनी नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित आरोप तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय सार्वजनिक माफी, भविष्यात अशा प्रकारचे आरोप न करण्याची लेखी हमी आणि मानसिक, सामाजिक तसेच व्यावसायिक नुकसानीसाठी 10 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही नोटिशीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या कायदेशीर नोटिशीनंतर प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. साहिल गोयल यांच्याकडून यावर काय भूमिका घेतली जाते, ते नोटिशीला उत्तर देतात की आरोपांबाबत स्वतंत्र स्पष्टीकरण सादर करतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT