पिंपरी : देशाच्या १५ व्या राष्ट्रपती (new president of india) म्हणून द्रौपदी मुर्मू (draupadi murmu)या विजयी झाल्या आहेत.भाजपकडून देशभर जल्लोष सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमधील (pcmc) सहाही मंडल प्रभागात भाजपने पेढे वाटून जल्लोष केला.भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे वडील किसनराव यांनी तो अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी खेड तालुक्यातील (जि.पुणे) कडूस येथील आदिवासी (ठाकर) पाड्यावर मिठाई वाटून आनंदोत्सव केला. (draupadi murmu latest news)
देशोच्या सर्वोच्चपदी मुर्मू यांच्या निवडीनिमित्ताने भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी नंदोत्सव साजरा केला. लांडगेंच्या वडीलांनी तर अनोख्या पद्धतीने तो केला. कडुसच्या ठाकर या आदिवासी जमातीच्या वस्तीवर ते गेले आणि त्यांनी तेथे मिठाईचे वाटप केले.
ते म्हणाले,"मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी समाजासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ओडीसा येथील संथाल समाजातून आलेल्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती मूर्मु यांचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.त्याचा आनंद देशभर साजरा होत आहे, तसाच आनंद आदिवासी पाड्यावर, वस्तीवरही झाला पाहिजे, "
"आपण मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत, अशी मानसिकता या समाजाची न राहता, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर आपण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, असा आत्मविश्वास या समाजामध्ये राष्ट्रपतींच्या रुपाने निश्चितपणे जागृत होईल," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डाही उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा सामना विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी झाला होता.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य युनिट्सने विजयानंतर जल्लोषाची तयारी केली आहे. ही निवडणूक जिंकून मुर्मू या आदिवासी समाजातील देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.