नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची आज ईडीनं तीन तास चौकशी केली. पुन्हा त्यांना २५ जुलै रोजी चौकशीसाठी ईडीनं बोलावलं आहे. दुसरीकडे आज देशभर ईडीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Sonia Gandhi news update)
कोरोना संसर्गामुळे ईडी चौकशीला हजर राहू न शकलेल्या सोनिया गांधींना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले होते. नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald Case)सोनिया गांधी ईडीसमोर (अंमलबजावणी संचालनालय) हजर झाल्या होत्या. सोनिया गांधी यांच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
ईडीने सोनिया गांधींच्या चौकशीबाबत एक खास प्लॅन तयार केला आहे. सोनिया गांधींची चौकशी तीन टप्प्यांमध्ये केली जाणार असल्याचे समजते. काँग्रेसने या चौकशीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे.
सोनिया गांधी या दुपारी १२ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या.त्याच्यासोबत राहुल गांधी व प्रियंका गांधी होत्या. चौकशी दरम्यान या दोघांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया यांच्यापासून लांब ठेवलं होतं. सोनिया यांची तब्येत बरी नसल्याने प्रियंका या औषधांसह त्यांच्यासोबत होत्या. तर राहुल गांधी हे काही काळानंतर ईडीच्या कार्यातून घरी परतले.
या पार्श्वभूमीवर तामिळनाडू काँग्रेसने सोनिया गांधी यांचे एक जुने वक्तव्य टि्वट केले आहे. यात सोनिया गांधी 'मी इंदिरा गांधींची सून आहे... आणि मी कोणाला घाबरत नाही,' असे टि्वटमध्ये म्हटलं आहे.
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र जे तोट्यात चालले आहे त्यावरून काँग्रेस नेत्यांवर विशेषत: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर या वृत्तपत्राच्या माध्यमातून फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 1 नोव्हेंबर 2012 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी 26 जून 2014 रोजी न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व आरोपींविरोधात समन्स जारी केले. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.