Pune News : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरण समोर आले आहे. यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड असा रोष पाहायला मिळत असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहेत.
गर्भवती महिलेचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल 25 पक्ष आणि संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर (Dinananath Hospital) आंदोलन केली आहेत. अद्यापही आंदोलनांचा सिलसिला सुरूच आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या पतीत पावन संघटनेच्या आंदोलनादरम्यान संघटनेच्या काही आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाला काळे फासले आहे.
हे काळ फासत असताना आंदोलकांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यादेखील नावाला काळे फासल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनात लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासण्यात आले आहे, याला ग्लोबल पुलोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी विरोध केला आहे. आंदोलन करताना आंदोलकांनी भान ठेवावे, असेही त्यांनी म्हंटल आहे.
वीरेंद्र चित्राव म्हणाले, 'भारतरत्न मिळालेल्या लता मंगेशकर यांच्याबाबत कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला विलक्षण असा आदर आहे. अनेकांना त्या देवस्थानी आहेत. त्यामुळे काल आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी रुग्णालयाच्या फलकाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी लता मंगेशकर यांच्या नावाला देखील काळे फासण्यात आले. ही माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत वेदनादायी गोष्ट असून अनेकांचे याबाबत फोन येत आहेत.
आंदोलन करताना लता मंगेशकर यांचे नाव सोडून उरलेला अक्षरांना काळे फसता आले असते. लोकशाहीने प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्यासाठी तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलन करत असताना आंदोलकांना भान असणे देखील आवश्यक आहे. लता मंगेशकर यांच्या नावाला काळे न फासता देखील राग व्यक्त करता आला असता. मात्र ते झाले नाही याचा आम्हाला खेद असल्याचे सांगत त्या घटनेचा वीरेंद्र चित्राव यांनी निषेध नोंदवला.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.