BJP MP Medha Kulkarni, along with local women, performs traditional Vat Purnima rituals under strict police protection at the historic Mahatma Jyotiba Phule Wada in Pune. Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni: वटपौर्णिमेसाठी सरकारी आदेश बदलला.. कडेकोट पोलीस बंदोबस्तात खासदार मेधा कुलकर्णींकडून फुलेवाड्यात वडपूजन

Phule Wada Vat Purnima, Medha Kulkarni, Pune Phule Wada Controversy: महात्मा फुलेवाडा येथे पुरोगामी संघटनांच्या विरोधानंतरही पुरातत्व विभागाच्या परवानगीने आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक महिलांसह पारंपारिक वटपौर्णिमा साजरी केली.

Sudesh Mitkar

Phule Wada Vat Purnima: महात्मा जोतिबा फुले यांच्या गंज पेठेतील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या फुलेवाडा येथे आज पोलीस बंदोबस्तामध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. पुरोगामी संघटनांचा विरोध आणि सरकारी आदेशांच्या पार्श्वभूमीवर, कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी परिसरातील महिलांसोबत वटवृक्षाची पारंपारिक पूजा केली.

वादाची पार्श्वभूमी आणि पुरातत्व विभागाची भूमिका

फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली होती. महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांची आठवण करून देत, वटपौर्णिमा साजरी करण्यास त्यांनी मज्जाव केला होता. या मागणीची दखल घेत सुरुवातीला पुणे येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यास बंदी घालणारे आदेश जारी केले होते.

मात्र, या निर्णयाला परिसरातील महिला आणि नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यांनी पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे दाद मागितली. त्यानंतर या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. १९६२ च्या अधिनियमानुसार, कोणतेही स्मारक 'संरक्षित' होण्यापूर्वी तिथे ज्या रुढी-परंपरा प्रचलित होत्या, त्या तशाच अबाधित ठेवणे ही कार्यालयाची जबाबदारी आहे. असं निर्णयावेळी सांगण्यात आलं.

यानंतर आता ४ दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाने २३ जूनला आदेश जारी केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने, वटपौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाड्याच्या परिसरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा आणि रुढी कायम ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहावी, यासाठी खडक पोलिसांनी आवश्यक ती चोख कामगिरी आणि कायदेशीर कार्यवाही करावी, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

खासदार मेधा कुलकर्णींकडून पूजा

त्यानुसार आज वटपौर्णिमेच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. या पोलीस बंदोबस्तामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी फुलेवाड्याला भेट दिली. आणि पोलीस संरक्षणात वाड्याच्या परिसरातील वटवृक्षाची शास्त्रोक्त पूजा केली. त्यांच्यासोबत परिसरातील अनेक महिलांनीही वडाची पूजा केली. आता या वादाला आणखी तोंड फुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT