Pune Cyber Crime News : भाजपचे नेते व माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात राहुल मगर नावाच्या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश राणे यांच्या विरोधात अश्लील ट्विट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. राहुल मगर या तरूणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सायबर पोलिस विभागात या प्रकरणी योगेश शिंगटे यांनी तक्रार दिली होती.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना ११ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान घडली आहे. राहुल मगर या व्यक्तीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर (@राहुलमगर32) माजी खासदार नीलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डल @meNeelesNRane यावर अश्लील भाषेत रिट्विट केले होते. यामुळे आता मगर नावाच्या व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे.
तसेच ठाण्यातील एका महिला कर्मचारीविरोधात देखील या राहुल मगर नावाच्या व्यक्तीने ६ मार्च रोजी ट्विटर वर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर, आता या प्रकरणी राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.