10th-12th Exams
10th-12th Exams Sarkarnama
पुणे

Board Exam News: सावधान! दहावी- बारावीच्या परीक्षांवर असणार नऊ हजार कॅमेऱ्यांची नजर

सरकारनामा ब्यूरो

Board Exam News: इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. या परिक्षेच्या दरम्यान गैरप्रकार होऊ नये, यासाठी पुणे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांवर आता तब्बल नऊ हजार कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची आता काही खैर नाहीये.

ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडण्यासाठी नऊ हजार केंद्रांवर मोबाईल कॅमेऱ्यांद्वारे (झूम कॅमेरे) वॉच असणार आहे. या वर्षी परीक्षा कॉपीमुक्त पार पडण्यासाठी बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान असणार आहे. तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान असणार आहे.

या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी आता मोबाईलमध्ये झूम कॉल करुन परीक्षेच्या दरम्यान परीक्षा हॉलचे तीन तासांचे शुटिंग केले जाणार आहे. परीक्षा सुरु झाल्यापासून ते उत्तरपत्रिका जमा करेपर्यंत परीक्षकांच्या मोबाईलमध्ये शुटिंग केले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोठा खर्च असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकसह, पुणे (Pune), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amravati), लातूर (Latur) व कोकण या 9 विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा 10 वीचे 17 लाख विद्यार्थी आणि 12 वीचे 15 लाख विद्यार्थी देणार आहेत. या दोन्ही परीक्षा पार पडण्यासाठी नऊ हजार केंद्र असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT