Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSarkarnama

Solapur Lok Sabha News: सोलापूर लोकसभेचे सुशीलकुमार शिंदेच उमेदवार?; युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे साकडे

भाजप खासदारांविषयीची जनतेतील नाराजी व शिंदे यांच्या कामाची आठवण यातून आगामी निवडणुकीत शिंदे यांनाच यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
Published on

सोलापूर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) दोनवेळा पराभव झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून ‘ब्रेक’ घेतला आहे. पण, भाजप (BJP) खासदारांविषयीची जनतेतील नाराजी व शिंदे यांच्या कामाची आठवण यातून आगामी निवडणुकीत शिंदे यांनाच यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे सोलापूर (Solapur) लोकसभेची आगामी निवडणूक शिंदे यांनीच लढवावी, असे साकडे युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून घातले. (Sushilkumar Shinde should contest Solapur Lok Sabha election : Youth Congress demand)

मोदी लाटेत लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ॲड शरद बनसोडे यांच्याकडून प्रथमच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर आणि शिंदे यांच्यातील मतविभाजनाचा फायदा पुन्हा भाजपला झाला आणि शिंदे पुन्हा पराभूत झाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा विजय झाला. मात्र, भाजपच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळात सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकही भरीव काम झालेले नाही. ॲड. महास्वामी जातीच्या बनावट दाखल्यावरून न्यायालयीन लढाई लढत आहेत. त्यामुळे भाजपचा आगामी उमेदवार शिंदे यांना टक्कर देईल, असा असणार नाही, अशी चर्चा आहे.

Sushilkumar Shinde
Nashik Graduate Constituency : भाजपच्या धनंजय जाधव यांची माघार; माघारीपूर्वी सत्यजित तांबेंबाबत केले मोठे विधान

केंद्रातील सोलापूर विकासाची मोठी कामे शिंदे यांच्या माध्यमातूनच मार्गी लागतील, अशी आशा सोलापूरकरांना आहे, त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून लांब गेलेले शिंदे यांनीच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेसच्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पूर्वीपासून होत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची सोलापुरातील त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे यांना पत्राद्वारे लोकसभा निवडणूक लढण्याची मागणी केली.

Sushilkumar Shinde
Mangaldas Bandal News : मंगलदास बांदलांना जेलवारी घडविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून शिंदे यांचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राजकीय व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढला आहे. भारत जोडो यात्रेत सुमारे २१ किलोमीटर पायी चालत ‘आपण अजूनही फिट आणि तरुण आहोत,’ असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याच्या मागणीनंतर शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

Sushilkumar Shinde
Pune News : राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले : पुण्यात पुन्हा ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ अशी बॅनरबाजी

निवेदन देताना काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे, सोलापूर शहर मध्यचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे, युवराज जाधव, योगेश मार्गम, विवेक कन्ना, शरद गुमटे, अर्जुन साळवे, सचिन वेर्णेकर, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, शुभम एकलदेवी, समीर काझी, नरेंद्र येलूर, नागेश म्याकल, अंजन जंगम, शब्बीर पुलमामडी, मनोहर मार्चला, लक्ष्मण पंडोरे, सिद्राम म्हेत्रे, शाम केंगारे, रवी जंगम, पिंटू सगळे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com