Nitin Gadkari Pune Tour : पिंपरी चिंचवडचे शिल्पकार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यावरील'परामर्शः एका शिल्पकाराचा' या ग्रंथाच्या प्रकाशन गुरुवारी (ता. २९) होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. (Latest Marathi News)
प्रा. मोरे हे खेडचे (आताचा शिरूर) दोनदा खासदार आणि राज्याचे माजी शिक्षणमंत्री होते. वक्तृत्वाची त्यांची खास अशी शैली होती. त्यांच्या जीवनकार्यावरील ४८० पानी ग्रंथांचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते गुरुवारी (ता. २८) होणार आहे. हा कार्यक्रम आकुर्डी येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान व अंशुल प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. (Congress News)
या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, तर संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे अध्यक्ष आहेत. माजी मंत्री दिवंगत प्रा. मोरे यांच्यासह १९७० सालापासून काम केलेले सहकारी, सनदी अधिकारी व चाहते उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हासदादा पवार व अंशुल प्रकाशनच्या संचालिका प्रा. तृप्ती जगताप यांनी सांगितले.
नितीन गडकरी गुरुवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यात ते विरोधी पक्षाच्या दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि सहा वेळा पुरंदरमधून आमदार झालेले दादा जाधवराव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला गडकरी हजेरी लावणार आहेत. सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात गुरुवारी (ता. २८) सकाळी पावणेबारा वाजता जाधवरावांचा नव्वदावा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानंतर गडकरी काँग्रेसच्या मोरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित लावणार आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.