Nagpur ZP News : गज्जू यादव म्हणतात, कौशल्य विकासमध्ये जिम येत नाही; तर जिल्हाधिकारी म्हणतात ‘हा’ ‘कौशल्य’चाच भाग !

ZP : ग्रीन जिम बसवण्याचे काम ‘कौशल्य विकास’अंतर्गत येत नाही.
Gajju - Udaysingh Yadav.
Gajju - Udaysingh Yadav.Sarkarnama
Published on
Updated on

The politics of Zilla Parishad is very hot right now : नागपूर जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये १३ कोटी रुपये खर्च करून ग्रीन जिम लावण्यात येणार आहेत. या विषयावरून जिल्हा परिषदेचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. गावांमध्ये ग्रीन जिम बसवण्याचे काम ‘कौशल्य विकास’अंतर्गत येत नाही, असे कॉंग्रेसचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांचे स्पष्ट म्हणणे आहे. (Green gym will be set up by spending 13 crore rupees)

विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याला शासन कौशल्य विकास म्हणते. परंतु जिम मारणे हा सुद्धा कौशल्य विकासाचाच एक भाग आहे; हे आश्चर्य वाटत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांचे तसे मत आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिम लावण्यात येणार आहेत.

हे जिम लावण्यासाठी १३ कोटींचा निधी हा कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. त्यामुळे मोठी शंका व्यक्त होत आहे. केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य शासनानेही खनिज निधीतून करण्यात येणाऱ्या कामांबाबत काही निकष निश्चित केले.

पाणी, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासह इतरही काही बाबींवर खर्च करता येते. ग्रीन जिमचा या निकषात समावेश नसल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जून २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्याचे आदेश दिले. रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील २०० गावात ग्रीन जिमचे साहित्य लावण्यात येणार आहे.

Gajju - Udaysingh Yadav.
Ramtek Loksabha News : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पाय रोवणे सुरू, कॉंग्रेस अजूनही ढिम्मच...

म्हणूनच कौशल्य विकास अंतर्गत निधी मंजूर?

जिल्हा परिषदेकडून (ZP) १३ कोटींची एकमेव निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मे फ्रेण्डस स्पोर्ट नामक कंपनीची १२ लाख ९९ हजार ६० हजारांची निविदा मंजूर करण्यात आली. एका गावात साधारणतः सहा लाख ४९ हजार ८०० रुपयांचे ग्रीन जिम लागणार असून त्यात आठ साहित्य राहणार असल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा १३ कोटींचा निधी कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर करण्यात आला. जिम मारणे हा कौशल्य विकास असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांचे (Collector) असल्याने कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत निधी मंजूर करण्यात आल्याचे दिसते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com