Nitin Gadkari News : भाजप नेते नितीन गडकरी हे सातत्याने राजकारणाबाबत कोणताही किंतु परंतु न ठेवता आपलं स्पष्ट मत मांडताना पाहायला मिळतात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा पक्षातील काही मंडळींचीह अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज देखील पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीमध्ये राजकारणाबाबत आपलं मत मांडलं.
भाजप(BJP) आपल्या मित्र पक्षांचा आणि मित्र पक्षातील नेत्यांचा फक्त वापर करून घेते अशी टीका सातत्याने विरोधी पक्षाकडून भाजपवर होताना पाहायला मिळते. त्यामुळे मित्र पक्षांबाबत भाजपाची युज अँड थ्रो ची भूमिका असल्याची टीका विरोधी पक्षाकडून होत असतानाच नितीन गडकरी यांनी राजकारणाबाबत पुण्यात एक विधान केलं आहे ते सध्या चर्चेत आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले, राजकारणाबद्दल माझ मत फारस चांगल नाही. इथे फक्त युज अँड थ्रो केला जातो. त्यामुळे पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. असं नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले, आणीबाणीच्या काळात आम्ही सातत्याने आंदोलन करायचो त्यासाठी मी जेलमध्ये गेलो आहे. माझ्या कडे जमानत करण्यासाठी 50 रुपये नव्हते म्हणून मला तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावेळी ५० रुपये पण कोणी द्यायला तयार नव्हतं त्यामुळे पैसा आयुष्यातलं साध्य नाही पण साधन आहे. अस गडकरी म्हणाले.
आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नसून विचार शून्यात ही समस्या आहे. म्हणजे जी पार्टी सत्तेत येईल तिच्यात घुसण्यासाठी सर्व तयार असतात. मात्र सत्ता गेली की ज्या प्रमाणे जहाज बुडताना उंदीर उड्या मारतात तसेच अनेक जण उड्या मारतात. मात्र शेवटी विचार महत्त्वाचा असतात असं गडकरी म्हणाले.
आजकाल राजकारणात प्रत्येकाला मंत्री पद हवं आहे. प्रत्येकाला आमदार, खासदार व्हायचं आहे. नको म्हणणार असा कोणी नाही. मात्र राजकारणात असं होतं की जो नको म्हणतो त्याच्या मागे पळत आणि ज्याला हवं त्याच्यापासून ते पळ काढत.
विधानसभा निवडणुकीत मी खूप फिरलो तेव्हा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांना सांगितलं माझा सभेला ५० लोक आले तरी चालेल पण भाडोत्री नको. कारण ती लोक एसटी मध्ये बसून येतात जेवण करतात आणि नेत्याचे भाषण सुरू होण्या आधीच पळून जातात. अस गडकरी म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.