Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड जिथं सरेंडर झाला, त्याच पुण्यात 'वाँटेड' घुले अन् सांगळेला पोलिसांनी घेरलं...

Beed police Sudarshan Ghule Sudhir Sangle Santosh Deshmukh murder case Pune : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोघा वाँटेड आरोपींना पुणे इथून घेतलं ताब्यात.
Santosh Deshmukh 6
Santosh Deshmukh 6Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी फरारी घोषित केले होते.

आरोपींबाबत माहिती देणाऱ्याना बक्षीस देऊ, असे जिल्हा पोलिस दलातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. या आरोपींबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर अली आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात केज पोलिस (Police) ठाण्यात सुदर्शन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे ,महेश केदार व प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या सात जणांवर गुन्हा नोंद आला आहे. यातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी पसार झाले आहेत.

Santosh Deshmukh 6
Dinvishesh 4 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

आरोपी पकडण्याच्या मागणीसाठी बीड (BEED) येथे लाखभर लोकांनी मोर्चा काढला. तसेच मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले. या गुन्ह्याच्या तपासासाठी गृह खात्याने IPS डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमली आहे.

Santosh Deshmukh 6
Prajakt Tanpure : पवारसाहेबांच्या शिलेदाराचा मोठा निर्णय; 'या' मुद्यावर घेतली माघार

फरारी आरोपींची आणि त्यांच्या नातेवाईकांची बँक अकाउंट देखील फ्रीज करण्यात आली असून मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे . तरी देखील आरोपींचा तपास लागत नसल्याने पोलिसांनी या तिघांबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते.

आता संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा देखील पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. त्यापाठोपाठ सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे वाँटेड देखील पुण्यातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने उचलले आहे. या दोघांना अधिक तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com