Nitin Gilbile Murder Case sarkarnama
पुणे

Nitin Gilbile Murder : फॉर्च्युनरमधील हत्येला वेगळे वळण, नितीन गिलबिलेच्या घात माजी नगरसेवकाने केला; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Nitin Gilbile Murder Case Former Corporator Kisan Tapkir : नितीन गिलबिले यांच्या हत्ये प्रकरणात माजी नगरसेवक किसन तापकीर यांचे नाव पुढे आले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत

Roshan More

Nitin Gilbile Case Update : मित्रानेच मित्राच घात करत हत्या करण्यात आल्याची घटना 12 नोव्हेंबरला उघडकीस आली होती. व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले यांची फॉर्च्युनरमध्ये मागे बसलेल्या मित्रांकडून डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होलीजवळील वडमुखवाडी येथे घडली होती.

नितीन यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह गाडीतून बाहेर फेकून आरोपी अमित पठारे, विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल हे फरारी झाले होते. हत्येची घटना सीसीटिव्हीत कैद झाली होती. दरम्यान, आरोपी ताम्हिणी घाटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना अटक केली होती. आरोपींच्या अटकेनंतर हा हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर माजी नगरसेवक किसन तापकीर यांचे नाव समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या जमीन व्यवहार आणि आर्थिक कारणामुळे झाल्याचे दिसून येत आहे.

किसन तापकीर फरार

किसन तापकीर यांचा या हत्येमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पण झाले आहे. मात्र, तापकीर हे आरोपींना अटक झाल्यानंतर फारर झाले आहेत. पोलिसांचे तापकीर यांचे नाव संशयित आरोपीमध्ये समाविष्ट केले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT