Thackeray ShivSainik network: ठाकरेंनी जुन्या शिवसैनिकांचे नेटवर्क पुन्हा केले अ‍ॅक्टिव्ह; निवडणुकीच्या तोंडावर दिली मोठी जबाबदारी

Shiv Sena old cadre revival News : येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून युद्धपातळीवर केली जात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेकडून गेल्या वर्षभरापासून रणनीती आखली जात आहे. नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

येत्या काळात होत असलेल्या बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) ज्येष्ठ शिवसैनिकांची टीम मैदानात उत्तरली आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी ठाकरेंनी जुन्या शिवसैनिकांचं नेटवर्क पुन्हा अ‍ॅक्टिव्ह केले आहे. त्यानुसार जवळपास मुंबईतील 800 पेक्षा अधिक ज्येष्ठ शिवसैनिक नव्या टीमला मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघणार आहे.

Uddhav-Thackeray
BJP Candidate Rush: इच्छुकांची भाऊ गर्दी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी, शिवसेना ठाकरे पक्षाला लागणार का लॉटरी!

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार आता ज्येष्ठ शिवसैनिकांची टीम कामाला लागली आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख म्हणून काम केलेली मंडळी त्यासोबतच त्याकाळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबीत काम केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांवर युवा पिढीला मार्गदर्शन करीत मरगळ दूर करण्याची जबाबदारी दिली आहे.

Uddhav-Thackeray
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून पक्षाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणे ही ठाकरे गटाची महत्त्वाची रणनीती आहे. त्याचा फायदा येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत होणार आहे.

Uddhav-Thackeray
Congress Trouble : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्षाचा राजीनामा; पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ!

यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकाशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाचा फायदा युवा पिढीला होणार आहे. आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. या युवक वर्गाकडून केल्या जात असलेल्या तयारीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना आता ज्येष्ठ शिवसैनिकांची टीम त्यांच्या तयारीला उतरली आहे. त्यामुळे शिवसैनिकात चैतन्य पसरले आहे.

Uddhav-Thackeray
NCP Pune News : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची 'गट्टी' जमणार? माजी महापौरांच्या गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com