Kirit Somaiya Sarkarnama
पुणे

पुरावे देऊनही परबांच्या विरोधात कारवाई होत नाही; सोमय्यांचा आरोप

परब यांच्या बांधकामात फसवणूक झाल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्टप्रकरणी तक्रार देऊनही गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आज केला आहे. या प्रकरणात सोमय्या यांनी आज दापोली पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा पुरावे सादर केल्याचे सांगितले.

परब यांच्या या बांधकामात फसवणूक झाल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे.ही वस्तुस्थिती असेल तर परब यांना पाठीशी घातले जात आहे का ? असा प्रश्‍न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.वास्तविक या गुन्ह्यात परब यांच्यावर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.या प्रकरणी दोन जूनला मी स्वत: दोपोली पोलीस ठाण्यात तक्रारी दिली आहे. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आज पुन्हा पुरावे सादर करण्यासाठी दापोली पोलीस ठाण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या यांनी गेल्या सहा महिन्यात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश आहे.सर्वच मंत्र्यांविरोधात पुरेसे पुरावे देऊनही राज्य सरकार कारवाई करत नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला.

राज्याचे अख्खे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी आहे. हे राज्य सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडाले असून सरकारला सामान्य माणसाशी कसलेही घेणे नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला.मंत्र्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसली तरी कारवाई होण्यासाठी पाठपुरावा कायम ठेऊ असा निर्धार सोमय्या यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT