गणेश नानासाहेब गायकवाड  सरकारनामा
पुणे

गणेश गायकवाडला जामीन नाहीच!

गायकवाड याला २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

Umesh Vishnu Ghongade

पुणे : आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी औंध येथील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.या गुन्ह्यात गणेश गायकवाड याला २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. नेमसे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६०), सोनाली दीपक गवारे (वय ४०), दीपक निवृत्ती गवारे (वय ४५ दोघेही रा. जंगली महाराज रस्ता), दीपाली वीरेंद्र पवार (वय ३८), भागीरथी इरप्पा उकली (पाटील) (वय ५०, दोघेही रा. औंध), राजू अंकुश (रा. सांगवी) आणि रघुनाथ राजाराम येंमुल (वय ४८, रा. बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. गणेश गायकवाड याच्या पत्नीने याबाबत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात गणेश गायकवाड याला २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी जामिनाला विरोध केला.

अर्जदार आरोपीने फिर्यादी यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा गुन्हा जादूटोणा कायद्यासंबंधी आहे. फिर्यादी यांचे स्त्रीधन आरोपीने लपवून ठेवले आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद मुरळीकर यांनी केला. मूळ फिर्यादीतर्फे ॲअॅड. सुधीर शहा आणि ॲअॅड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दादा गायकवाड करीत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT