शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला पण…

नवाब मलिक यांच्या टिकेवरून सेनेलाही लक्ष्य करण्याचा आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा प्रयत्न
आमदार अशिष शेलार
आमदार अशिष शेलारसरकारनामा
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही सत्ता स्थापन केली. याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही.तुम्ही हिंदूत्व सोडलं त्याबद्दलही आम्ही काही बोलत नाही. तुमची देशभक्ती पहिल्या इतकीच आजही कायम आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी अर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांसारख्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अशिष शेलार यांनी आज केला.

आमदार अशिष शेलार
`बघा! काय दिवस आले; जे मलिक भ्रष्ट ठरले ते भ्रष्टाचाराची व्याख्या करतायेत`

पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, ‘‘मलिक करीत असलेले आरोप व त्यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितत केलेले मुद्दे यात आम्ही कुठेही राजकारण आणत नाही. हा देशाचा आणि देशाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचा विषय आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी जे दाऊद इब्राहिमशी संबंधित आहेत.अशा लोकांबरोबर अर्थिक व्यवहार करून ज्यांनी अर्थिक स्वार्थ साधला,अशा मंत्रीपदावर असलेल्या मलिक यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करीत आहोत.’’

आमदार अशिष शेलार
आनंदाची बातमी : ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एका वर्षाची सवलत

रियाज भाटीच्या विषयावरून मलिक करीत असलेल्या आरोपांचा समाचार शेलार यांनी घेतला.भाटी याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेली छायाचित्रे शेलार यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.अनिल देशमुख प्रकरणातील बडतर्फ पोलीस आधिकारी सचिन वाजे याच्यासोबत रियाज भाटी याचे संबंध होते.भाटी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. तो फरार आहे की त्याला पळविण्याचे काम राष्ट्रवादीने केले, असा आरोप शेलार यांनी केला.

भाटीसाख्या माणसाला सांभाळण्याचे क्रिकेटच्या राजकाणात त्याला राजाश्रय देण्याचे काम कुणी केले. हे साऱ्या महारष्ट्राला माहीत आहे, असे शेलार यांनी सांगितले.हाजी अराफत आणि हाजी हैदर यांची चौकशी करूनच पक्षात त्यांना पदे देण्यात आली. मुन्ना यादववर एक गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याचा खुलासा ते स्वत:च करतील, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com