Praniti Shinde

 

Sarkarnama

पुणे

मंत्रीपद नाही पण प्रणिती शिंदेंना मिळाली ही जबाबदारी

राज्याच्या मंत्रीमंडळात सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही.आघाडीतील कोणत्याच पक्षाने सोलापूरचा (Solapur) विचार केलेला नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल या यासाठी वाट पाहणाऱ्या सोलापूरच्या युवा नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पक्षाने राज्य प्रवक्ते पदावर संधी दिली आहे. प्रदेश कॉंग्रेसने (State Congress) गुरूवारी जाहीर केलेल्या आठ जणांच्या प्रवक्त्यांच्या यादीत आमदार शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिंदे यांच्याशिवाय भावना जैन, गोपाळ तिवारी,निजामुद्दीन राईन, डॉ. सुधीर ढोणे, चारूलता टोकस, हेमलता पाटील, दिलीप एडतकर व भरत सुरेश सिंह यांचा यात समावेश आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री मंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात शिंदे यांना ‘वेटींग’वर राहावे लागले आहे.

प्रणिती या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीरकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळले आहे. प्रणिती या कॉंग्रेसच्या तरूण नेत्यांच्या फळीतील महत्वाच्या नेत्या मानल्या जातात. राज्यमंत्री मंडळात विश्‍वजीत कदम,यशोमती ठाकूर, अमित देशमुख अशा तरूण नेत्यांना स्थान मिळत असताना प्रणिती शिंदे यांची संधी का हुकली याचा अंदाज लागत नाही.राज्य सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेबदल करताना कॉंग्रेसच्या कोट्यातून प्रणिती शिंदे यांची वर्णी लागेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मंत्रीमंडळाच्या खातेबदलाला कधी मुहूर्त लागणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे शिंदे यांचे मंत्रीपददेखील सध्यातरी अधांतरीच आहे.

राज्याच्या मंत्रीमंडळात सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही.आघाडीतील कोणत्याच पक्षाने सोलापूरचा विचार केलेला नाही. परिणामी पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या दत्तात्रय भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.कॉंग्रेस पक्षाने शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी मागणी याआधीदेखील झाली आहे. मात्र, तूर्ततरी पक्षाने शिंदे यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT