राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरकारनामा
पुणे

आत्महत्या नव्हे; ही तर सरकारी कारभारातून झालेली हत्याच

अपुरे वेतन, वेतनातील अनियमितता, कंत्राटी पद्धत या कारणांना कंटाळून गेल्या दोन वर्षात तब्बल २८ एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एसटीच्या चालकाने केलेली आत्महत्या हे या सरकारचे मोठे अपयश असून ही आत्महत्या नव्हे तर सरकारी कारभारातून झालेली हत्या आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नगरमधील एका एसटी चालकांने आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. पाटील यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये पाटील म्हणतात, ‘‘ कालच औसा येथे एसटी कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांच्या व्यथा ऐकून उद्विग्न झालो होतो. आज चालकाने एसटीतच आत्महत्या केल्याची मातमी आली.शेतकऱ्यांने शेतात केलेल्या आत्महत्ये इतकच हे भीषण आहे. हा आक्रोष महाविकास आघाडी सरकारच्या कानी जात नाही ? आत्महत्या नव्हे;ही तर सरकारी कारभारातून झालेली हत्याच.’’

गेल्या दोन वर्षात अपुरे वेतन, वेतनातील अनियमितता, कंत्राटी पद्धत या कारणांना कंटाळून तब्बल २८ एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्य गेल्या दीड वर्षात एसटी कर्मचाऱ्यांचे भयंकर हाल झाले. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कमी आहेत. गेल्या चाळीस वर्षात कर्मचाऱ्यांची अनेक आंदोलने झाली. मात्र, त्यातून ठोस आणि कायमस्वरूपी असे त्यांच्या हाती काही पडले नाही. परणामी एसटी कर्मचारी इतर सरकारी कर्मचारी किंवा सरकारी महामंडळाचे कर्मचारी यांच्या तुलनेत सोयी सुविधांपासून दूर राहिले.

गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या संपातून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे मान्य केल्याने बहुतांश संघटनांन संपातून माघार घेतली आहे.ही तात्पुरती उपाययोजना असली तरी कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी ठोस उपायांची गरज आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT