कोरोना लसीकरण : महाराष्ट्राला मागे टाकत उत्तरप्रदेशने घेतली आघाडी

महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तेथील लाभार्थींची संख्या मोठी आहे.
Corona Vaccination
Corona VaccinationSarkarnama
Published on
Updated on

पुणे : देशात लसीकरणात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेशने नुकतेच मागे टाकले. त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये उत्तरप्रदेश पहिला तर महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्याला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनीही केंद्रांवर रांगा लावून लसीकरण केले. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग वाढला होता. पहिल्या आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांमध्ये राज्य आघाडीवर होते. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागत होता, तर गुजरात राज्य तिसऱ्या क्रमांकावर होते.जुलैनंतर उत्तर प्रदेशातील लसीकरणाचा वेग वाढला. पहिल्या डोस देणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशने आता महाराष्ट्राला मागे टाकले आहे.

Corona Vaccination
…आता हे फारच झालं; फरार माजी गृहमंत्र्याचा पक्ष सुसंस्कृतपणा शिकवतोय

महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरला दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या दोन कोटी ८१ लाख ६२ हजार ९६४ होती. त्यावेळी उत्तर प्रदेश दोन कोटी ५८ लाख ४७ हजार १९८ नागरिकांचे दोन्ही डोस झाले होते. आता बारा दिवसांमध्ये उत्तर प्रदेशने लशीच्या दुसऱ्या डोसमध्येही महाराष्ट्राला मागे टाकल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लसीकरणाचाही वेग मंदावला असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले. राज्यात मार्चनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली होती. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली. एकट्या पुण्यातून खासगी लसीकरणाच्या माध्यमातून १४१ कोटी रुपयांची उलाढाल झाली. या वरून राज्यातील नागरिकांनी लसीकरणाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.

Corona Vaccination
किरण गोसावी समित पटेल बनून पोलिसांना गुंगारा देत होता

महाराष्ट्रात ९ कोटी १४ लाख लाभार्थींपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोचविण्याचे आव्हान आहे. आतापर्यंत पहिला आणि दोन्ही असे मिळून राज्यात ९ कोटी ७१ लाख ७४ हजार ४२४ डोस देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकूण डोसची संख्या १२ कोटी ९१ लाख २६ हजार ७९४ असल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तेथील लाभार्थींची संख्या मोठी आहे. त्यासाठी तेथील लसीकरण केंद्रांची संख्या मोठी असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.

राज्य .................. पहिला डोस ............... दुसरा डोस

महाराष्ट्र .............. ६,६६,३३,८०४ ............ ३,०५,४०,६२०

उत्तर प्रदेश ......... ९,७४,५९,५४६ ............. ३,१६,६७,२४८

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com