गणेश बिडकर  सरकारनामा
पुणे

…आता हे फारच झालं; फरार माजी गृहमंत्र्याचा पक्ष सुसंस्कृतपणा शिकवतोय

राष्ट्रवादी काँग्रेस शहरात कोणती संस्कृती रुजविली आहे, हे सर्वांना माहिती आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ‘ज्यांच्या नातेवाइकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना मोक्का लावला आहे. ज्या पक्षाचे गृहमंत्री राहिलेले नेते फरार आहेत, अशा पक्षाच्या शहराध्यक्षांनी भाजपला संस्कृती आणि सुसंस्कृतपणा शिकवू नये,’ असा पलटवार महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.त्यांच्या पक्षाशी संबंधितांवर लावण्यात आलेल्या मोक्का कारवाईबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी खुलासा करावा, असे आव्हान बिडकर यांनी दिले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फोटोबायोग्रॉफी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला शहरातील दोन गुंडाच्या पत्नींनी हजेरी लावली होती. त्यांना पक्षप्रवेश दिला जाणार होता असा आरोप राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता. त्यावर बिडकर आणि खर्डेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले. बिडकर म्हणाले, ‘‘कार्यक्रमाला येण्यापासून आम्ही कोणालाही रोखू शकत नाही. जगताप यांनी आक्षेप घेऊन त्या महिला भगिनीविषयी अनादरच व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन वर्षांत शहरात उत्तम केले आहे. त्यामुळे आमागी महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू लागली आहे. त्या नैराश्येतूनच जगताप हे पाटील यांच्यावर टीका करीत आहे’’.

राष्ट्रवादी काँग्रेस शहरात कोणती संस्कृती रुजविली आहे, हे सर्वांना माहिती आहे. जगताप यांनी त्यांच्या पक्षातील मोक्का कायद्यानुसार कारवाई झालेले त्यांच्या नातेवाइकांबद्दल आधी बोलावे. चंद्रकांत पाटील यांना मोठे भाऊ या आपुलकीने दादा म्हटले जाते. त्यामुळे कोण ‘दादा’ कसे आहेत, हे पुणेकरांना माहिती आहे,’ असेही ते म्हणाले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT