Dhahanjay Munde, Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

OBC political leaders : आधी धनंजय मुंडे आता चाकणकर! ओबीसी नेत्यांच्या घेतल्या जातायेत विकेट? नेत्याचा गंभीर आरोप

Dhananjay Munde controversy, Rupali Chakankar news : ओबीसी महिला नेत्या असलेल्या चाकणकरांना ट्रोल करायचं आणि असल्या एखाद्या माध्यमातून त्यांची विकेट घ्यायची हा ट्रेंड आता पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतरही रूपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे आणि तृप्ती देसाई त्यांच्यासह इतरांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. या टीकेवर आता ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ओबीसी नेत्यांना मीडिया ट्रायल करून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

मंगेश ससाणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, कॅप्टन खरातचे प्रकरण समोर आलं आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. परंतु या प्रकरणामध्ये रूपाली चाकणकर यांनी खरातला गुरु मानून पाद्यपूजन केले म्हणून ट्रोल केले जात आहेत. त्यांचे फोटो सातत्याने सोशल मीडिया आणि आणि इतर माध्यमातून दाखवून खरात सोबत चाकणकर देखील तितक्याच दोषी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न मीडिया ट्रायल द्वारे करण्यात येत आहे.

खरातसोबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, दीपक केसरकर,सुनील तटकरे चंद्रकांत पाटील, जयंत पाटील या सर्वांचे फोटो आहेत. मात्र यातील एकालाही कोणी जाब विचारला नाही अथवा यांची मीडिया ट्रायल झाली नाही. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना खरात यांच्या संस्थेला गोदावरी नदीतून पाण्याचा हक्क देण्यात आला. त्यामुळे जयंत पाटील यांची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासोबतच सात मोठ्या मंत्र्यांच्या संपर्कात हा खरात होता. मात्र त्या मंत्र्यांचे देखील राजीनामे कोणी मागितले नाही, असे ससाणे म्हणाले.

ओबीसी महिला नेत्या असलेल्या चाकणकरांना ट्रोल करायचं आणि असल्या एखाद्या माध्यमातून त्यांची विकेट घ्यायची हा ट्रेंड आता पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील असंच करण्यात आलं. केलं एकाने मात्र धनंजय मुंडे यांना आपला राजीनामा देऊन भोगावे लागलं, असा आरोप सराणे यांनी केला आहे.

आपण आसाराम बापू यांच्या पाया पडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाहिले असेल. तसेच राम रहीमच्या आणि बाबा नित्यानंदच्या दरबारात जाणारे नेते पाहिले असतील. मात्र त्या नेत्यांची अशा पद्धतीने मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतला नाही. मग ओबीसी महिला ट्रोल करून तिची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द खराब का केली जात आहे, असा सवाल ससाणे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT