Rupali Chakankar News, Pune Latest Marathi News
Rupali Chakankar News, Pune Latest Marathi News Sarkarnama
पुणे

इतरांना न्याय देणाऱ्या रूपाली चाकणकरांवरच अश्लील काॅमेंट.... धाडस किती वाढलय?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महिलांवरील अत्याचार, अन्याय याविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यरत असतो. पण याच महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच काही विकृत मंडळींचा सामना करावा लागत असेल तर? आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना असाच अनुभव त्यांनी वटपौर्णिमेबाबत केलेल्या पोस्टवर आला. (Rupali Chakankar News)

चाकणकर यांनी मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यावरून अनेकांनी खालच्या भाषेत काॅमेंट केल्या. अशा काॅमेंटवर कारवाई होऊ शकते. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद संवैधानिक आहे आणि अशा प्रकारांची ते दखल घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू शकतात, हे माहीत असतानाही अशा मंडळींनी सोशल मिडियावर नको त्या काॅमेंट केल्या. (Pune Latest Marathi News)

याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात चाकणकर यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त मी स्वतः जात नाही, हे सांगितले. त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली. सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली. यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे, असा अभिप्राय कुलकर्णी यांनी नोंदवला आहे.

त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली. मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक काॅमेंट आहेत. विशेष म्हणजे रूपाली चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते हे माहीत असूनही अशा काॅमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण आहे. अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहे. तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच, अश्लील काॅमेंटबाबत मी त्यांनाच पत्र लिहितो आहे.सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी करणार आहे.

त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा काॅमेंट केल्या तर स्वतःहून कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT