Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
पुणे

Narayan Rane : पत्रकाराच्या मृत्यूवर नारायण राणे म्हणतात, "मी काय तेवढंच बघू का..?

सरकारनामा ब्युरो

Konkan Journalist Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे एका अपघातात पत्रकार शशिकांत वारीसे (Shashikant Warise)यांचा मृत्यू झाला. यावरून राज्यातील सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान देवेंद्र फडवणवीस यांच्यासह इतर भाजपच्या इतर नेत्यांवरही आरोप होत आहेत. असे असतानाही कोकणातील मोठे नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूबद्दल बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. कोकणात सहा जिल्हे आहेत. तेथे कुणाची हत्या झाली, अपघात झाला तर मी त्यावरच बोलू का, पत्रकारांनीही तेच विचारावं का, असे विधान त्यांनी केले.

नारायण राणे (Narayan Rane) आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणे कोकणातील बडे नेते आहेत. त्यामुळे पत्रकारांनी सध्या गाजत असलेल्या पत्रकार वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न विचारले. त्यावर मात्र राणे यांनी बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला.

राणे म्हणाले, "वारीसे पत्रकाराला मी कधी भेटलो नाही. त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. विनायक राऊत (Vinayak Raut) सिंधुदुर्गला लागलेली कीड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे काही झाले तरी तेथे ते असतात. विकासकामांना आंदोलने करून आडथळे आणतात. मी विनायक राऊत आणि वारीसे यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही."

वारीसे मृत्यूप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर राणे म्हणाले,

"देवेंद्र फडणवीस धमक्या देणारे नाहीत. आंगणेवाडीतील भाषणात कुणीही धमक्या दिलेल्या नाहीत. संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत असे काही महाराष्ट्राचे देशाचे नेते नाहीत. त्यांची मी दखल घेत नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत. त्यानंतर जे काही बाहेर येईल ते सर्वांना समजेल."

दरम्यान, वारीसे प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी चौकशीची मागणी केली. खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत सातत्याने भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोकणातील असूनही राणे यांनी मात्र त्यावर बोलण्यास नकार दिला. राणे म्हणाले, "कोकण म्हणजे सहा जिल्हे आहेत. मी महिन्यातून काल तेथे गेलो. कोकणात कुठे अपघात झाला, हत्या झाली तर तेच प्रश्न लावून धरायचे का? याशिवाय पुण्यात काही विकासाचे प्रश्न नाहीत का? अन्य ठिकाणी स्थानिक प्रश्न विचारले जातात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT