covaxin  sarkarnama
पुणे

तीन महिन्यानंतर पिंपरीत कोरोनाचा बळी, रुग्णांची संख्या वाढली..

PCMC हद्दीत चौथ्या लाटेचा प्रभाव दिसू लागलाय...

उत्तम कुटे

पिंपरी : कोरोनाच्या सौम्य समजल्या जाणाऱ्या चौथ्या (Corona) लाटेतील पिंपरी-चिंचवडमधील (PCMC) पहिला बळी गुरुवारी (ता.७) गेला. ३५ वर्षीय महिलेचा तीन दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा चार हजार ६२५ वर गेला. दरम्यान,२२० नवे कोरोना रुग्ण शहरात आढळून आले.त्यामुळे १ जुनला एक आकड्यात आलेली शहराची रुग्णसंख्या सव्वा महिन्यात चार आकडी (१४५८) वर गेली आहे.

दरम्यान,अतिशय सौम्य असलेल्या कोरोनाच्या चौथ्या लाटेत रुग्ण दगावल्याने पिंपरी महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. मृत्यू झालेल्या भोसरीतील या महिलेला इतरही आजार होते,असे पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले. ती चार तारखेला रुग्णालयात दाखल झाली होती. तीन महिन्यानंतर कोरोनाने शहरात हा मृत्यू झाला आहे. यापूर्वी तिसऱ्या लाटेत मार्च महिन्यात मृत्यूची नोंद झाली होती.

याच महिन्यात दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावर्षीच्या या साथीच्या पहिल्या लाटेने ज्येष्ठांना लक्ष्य केलं होते. तर दुसऱ्या लाटेत तरुण अधिक बळी पडले.तिसऱ्या लाटेने लहान मुलांवर संक्रात आणण्य़ाचा प्रयत्न केला होता.तर,चौथी लाट ही सौम्य़ निघाली. त्यात साधा खोकला व सर्दी होत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. १४५८ सक्रिय रुग्ण सध्या शहरात असून त्यातील १४१४ हे घरीच विलगीकरणात असून फक्त ४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

दुसरीकडे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरुच आहे.मात्र,त्याचा वेग मंदावलेला आहे. आज फक्त १८०१ जणांना ही लस देण्यात आली. त्यात खासगी रुग्णालयातून ती बहूतांशजणांनी घेतली.त्यातून एकूण लसीकरणाचा आकडा ३६ लाख ६५ हजार ३५९ झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT