अजित पवारांकडे बैठक असायची, त्यावेळी मीही वेळेवरच जायचो! : एकनाथ शिंदेंकडून कौतुक

कोरोना काळात सगळे मंत्री मंत्रालयात येत नसत. मीही कधी जायचो, कधी नाही. पण, सर्वाधिक काळ मंत्रालयात बसणारा मंत्री हा अजितदादांच्या रुपाने बसलेला आहे.
Ajit Pawar-Eknath Shinde
Ajit Pawar-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) हे हजरजबाबी, रोखठोक आणि शिस्तप्रिय व्यक्तीमत्व आहे. त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. त्यांच्याकडे बैठक असायची, त्यावेळी मीही वेळेवर जायचो. बैठकीला जायचं नसेल तर सांगायाचो की मी दुसऱ्या कामात आहे. पण अजितदादांच्या बैठकीला उशिरा जाणे टाळायचो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजितदादांच्या वक्तशीरपणाचे कौतुक केले. (I go to Ajit Pawar's meeting on time : Eknath Shinde)

राज्याच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात बोलताना शिंदे यांनी पवारांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अजित पवार हे हजरजबाबी, रोखठोक व्यक्तीमत्व आहे. त्या स्वभावाचा त्यांना अनेकादा फायदा झाला, तसा तोटाही झाला आहे. पण, त्यांचा स्वभाव ते काही सोडत नाही. अजितदादांकडे बैठक असायची, त्यावेळी मीही वेळेवर जायचो. शेवटी ते आमचे उपमख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रीमंडळातील मी नगरविकास मंत्री होतो. त्यामुळे शिस्त आपण बिघडवली तर बाकीचे कसे ठेवणार, त्यामुळे अजितदादांची शिस्त मीही पाळायचो.

Ajit Pawar-Eknath Shinde
अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

एकदा पुणे मेट्रोची पाहणी होती, मी म्हणाले की किती वाजता पाहणी करायची आहे. त्यावर दादा म्हणाले की सकाळी सात वाजता. मी सांगितले की, मी तर पहाटे चार वाजता झोपतो आणि सकाळी सातला पुण्यात कसे पोचणार. पण, त्यांनी सकाळी सात वाजता मेट्रोचा पाहणी दौरा केला. वेळेचे काटेकार नियोजन त्यांच्याकडे असते. कोरोना काळात सगळे मंत्री मंत्रालयात येत नसत. मीही कधी जायचो, कधी नाही. पण, सर्वाधिक काळ मंत्रालयात बसणारा मंत्री हा अजितदादांच्या रुपाने बसलेला आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Eknath Shinde
गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून मी धनंजय मुंडेंनाही मतं दिलंय : ठाकूरांनी सांगितले गुपीत

ते म्हणाले की, कामाचा झपाटा, लोकांच्या मदतीस धावून जाण्याची वृत्ती यामुळे बारामती मतदारसंघात विलक्षण लोकप्रिय आहेत. सात वेळा निवडून आल्यानंतर लोक म्हणतात की आता बसं झालं. पण, अजितदादा हे वाढत्या मताधिक्क्याने सात वेळा निवडून आलेले आहेत. अजितदादांनी आपली लाेकप्रियता टिकवून ठेवली आहे. त्यांनी प्रत्येक खात्यात आपला ठसा उमटवला.

Ajit Pawar-Eknath Shinde
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे ७ आमदार बहुमत चाचणीस गैरहजर; राष्ट्रवादीच्या दोघांची दांडी

अजितदादांचा दरारा सर्वत्रच आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. एखादा अधिकारी जबाबदा टाळत असेल तर ते त्यांना आवडायचे नाही. एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल तर ते मुलाहिजा न ठेवता बोलायचे. त्यामुळे संबंधांची चूक कळते. ती भूमिका घेण्याची ताकद सर्वांमध्ये नसते. अजित पवार म्हणजे अजिंक्य शक्ती आहे, असे खुल्या मनाने मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com