Bullock cart race
Bullock cart race  Sarkarnama
पुणे

Loni Kalbhor Bailgada Sharyati: बैलगाडा शर्यतीत स्टेज कोसळून एकाचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय ?

सरकारनामा ब्यूरो

Pune Loni Kalbhor Bailgada Accident: सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यती होत आहेत. पण दुसरीकडे या शर्यतींमध्ये दुर्घटनांच्याही बातम्या समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक लहान मुलगा शर्यत सुरु असतानाच घाटात पडला. त्यांच्या अंगावरुन घोडी गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता.ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातूनही दुसरी घटना समोर आली आहे.

पुण्यातील (Pune) लोणी कळभोर येथील रामदऱ्याजवळ आयोजित बैलगाडा शर्यतींना गालबोट लागले आहे. यासाठी मोठा स्टेजही बांधण्यात आला होता. पण हे स्टेज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (५ जून) सायंकाळी ही घटना घडली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बैलगाडा शर्यतीसाठी (Bailgada Sharyat) उभारलेले स्टेज कोसळल्याने बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला. तर शुभम विजय लोखंडे (वय २४), मयूर प्रमोद लोखंडे (वय २५), विकास वाल्मिक ढमाळे (वय २४, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी लोणी काळभोर येथे बैलगाडा शर्यतींसाठी ग्रामस्थांनी स्टेज बांधला होता. पण संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत होते. शर्यतींसाठी आलेले बाळासाहेब कोळी, विकास ढमाळे, शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, स्टेजच्या आडोशाला थांबले होते. पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज कोसळला आणि आडोशाला थांबलेल्या कोळी, लोखंडे, ढमाळे यांच्या अंगावर कोसळला. (Bullock Cart Race News Update)

स्टेज कोसळल्याने नागरिकांचीही चांगलीच धावपळ झाली. नागरिकांनी चौघानाही हडपसर येथील रुग्णालयात तातडीने दाखल केलं. पण गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब कोळी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT