Solapur News : सोलापूर जिल्ह्यात दोन हजारच्या नोटांचा बोलबाला, दहा दिवसांत 'एवढ्या' नोटा बॅंकेत जमा

2000 Rupee Note : ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत बॅंकेत जमा करणे बंधनकारक आहे.
2000 Note
2000 NoteSarkarnama

Solapur: भारतीय रिझर्व्ह बँकेनं काही दिवसांपूर्वी महत्वपूर्ण घोषणा करताना दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यावेळी बॅंकेकडून ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर समाजाच्या सर्वच स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचदरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.

दोन हजारांच्या (2000 Note) जमा करण्यासाठी ग्राहकांना २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत तब्बल १०० कोटींच्या नोटा बॅंकांमध्ये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत लोक आपापसातील व्यवहारासाठी या नोटांचा वापर करू शकतात. ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत बॅंकेत जमा करणे बंधनकारक आहे.

2000 Note
Rajasthan Politics : सचिन पायलट भाजपमध्ये जाणार की नवा पक्ष काढणार? ; लोकांना काय वाटतं?

सोलापूर(Solapur) जिल्ह्यात आतापर्यंत १०० कोटींच्या नोटा जमा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातून २३ मे ते दोन जून या कालावधीत एकूण चार लाख ९९ हजार ४७ नोटा जमा झाल्याचेही माहिती समोर आली आहे. याबाबत बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देताना सोलापूरमधील बॅक ऑफ इंडिया व स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत १०० कोटींच्या नोटा जमा झाल्याची माहिती दिली आहे.

ग्राहकांनी दोन जूनपर्यंत‘एसबीआय’च्या ट्रेझरी शाखेत ३२ कोटी दोन लाख ९४ हजार रुपयांच्या तर बॅंक ऑफ इंडियामध्ये ६७ कोटी ७८ लाख रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. दररोज एका व्यक्तीला दहा नोटाच बदलून घेण्याचं बंधन आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण चार लाख ९९ हजार ४७ नोटा जमा झाल्याची माहिती बॅंक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

2000 Note
Odisha Train Accident : जबाबदारीपासून पळत नाही, आम्ही काम करतोय; रेल्वे अपघातावर केंद्रीय मंत्री म्हणाले..

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. मध्यरात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(Reserve Bank Of India)ने दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. बॅंकेत 23 मे 2023 पासून नोट बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंत नोटा बदलून मिळत आहेत.

2000 Note
Ambadas Danve On Shivgarjana News : हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा, पण इतर धर्माचा द्वेष नाही..

...म्हणून दोन हजारची नोट चलनातून रद्द

'नोटाबंदीनंतर २०१६ साली २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. मात्र इतर नोटा चलनात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने २ हजार रुपयांच्या नोटेच्या उद्दिष्टाची पूर्तता झाली. त्यामुळे २०१८-१९ मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्के नोटा या २०१७ च्या आधी बाजारात आणण्यात आल्या होत्या. ३१ मार्च २०१८ मध्ये २ हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा चलनात होत्या. याचे मूल्ल ६.७३ लाख कोटी इतके होते. मात्र नंतर चलनात असलेल्या या नोटांची संख्या कमी झाली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com