Army Chief General Upendra Dwivedi 
पुणे

Gen Upendra Dwivedi : लष्कर प्रमुखांनी केलं Gen Z च कौतुक! NDAच्या पासिंग आऊट परेडमध्ये दिला मोठा इशारा

Operation Sindoor 2.0 : पुण्याच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (NDA) १५० व्या तुकडीचा पदवीदान समारंभ आज पार पडला. यावेळी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूर २.० राबवण्याबाबत महत्वाचं विधान केलं.

Amit Ujagare

Operation Sindoor 2.0 : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटक नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात थेट युद्ध पुकारत ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं. या कारवाईला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं, पण हे ऑपरेशन अद्यापही सुरुच आहे संपलेलं नाही. उलट लष्कर आता ऑपरेशन सिंदूर २.० राबवण्यासाठी सज्ज असल्याचं विधान भारतीय लष्कराचे प्रमुख उपेंद्र जनरल द्विवेदी यांनी केलं आहे. पुण्याच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) १५०व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

सूचक इशारा

जनरल द्विवेदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरुच आहे. सध्या फक्त तात्पुरता युद्धविराम झालेला आहे. पण जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय लष्कर आणि सैन्याचे तीन अंग ऑपरेशन सिंदूर २.० साठी तयारी करत आहेत. युद्धाच्या बदलत्या पॅटर्नवर बोलताना ते म्हणाले, भविष्यातील संघर्ष हा पारंपारिक जमीन, हवा आणि समुद्री क्षेत्रातून पु़ढे जात अंतराळ, सायबर आणि कॉग्निटिव्ह युद्धाच्या क्षेत्रातही पसरु शकतात.

युद्धांचं मैदान आता पारदर्शी

लष्कर प्रमुखांनी यावेळी हे देखील सांगितलं की, आधुनिक युद्धक्षेत्र आता खूपच पारदर्शी बनलं आहे. त्यामुळं सैन्याची सुरक्षा आणि तैनातीशी जोडलेले निर्णय आधीपेक्षा अधिक महत्वाचे बनले आहेत. काळासोबत आम्ही हे पाहिलंय की, युद्धाची परिस्थिती आता २४/७ बनली आहे. युद्धाचं मैदान आता इतकं पारदर्शी झालं आहे की, प्रत्येक हालचालींची माहिती समोरच्या शत्रूला मिळत असते. त्यासाठी आपली तैनाती, वापर आणि आपल्या सैन्यासोबत सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबत खूपच जास्त सावधानी बाळगावी लागेल.

विजय मनात असतो जमिनीवर नाही

युद्धातला विजय हा आधी कायम मनात असतो, जमिनीवर नाही. त्यामुळं माहितीचं युद्ध तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा संपूर्ण देश एकजूट होऊन त्या लोकांवर भरवसा करावा जे माहिती पुरवत आहेत. जर असं झालं तर मी तुम्हाला विश्वास देतो की, जे राष्ट्र एक-दुसऱ्यावर आणि या सर्व हितचिंतकांवर विश्वास करतं ते युद्धात कायमच विजयी होत असतं.

जेनझींचं कौतुक

यावेळी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी तरुणांसोबत अनौपचारिक गप्पा देखील मारल्या. यावेळी त्यांनी आजच्या तरुण पिढीचं कौतुक केलं, तसंच जेनझीला आपल्या पिढीपेक्षा हुशार असल्याचं म्हटलं. यावेळी लष्कर प्रमुखांनी कॅफे सुरु करण्याचा आपला मानसही बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT