Supriya Sule: प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, मी समजू शकते...

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला अहिल्यानगर जिल्ह्यात फटका बसला आहे.
Supriya Sule_Prajakt Tanpure
Supriya Sule_Prajakt Tanpure
Published on
Updated on

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला अहिल्यानगर जिल्ह्यात फटका बसला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. नेमकं काय घडलं हे त्यांनी स्पष्टचं सांगितलं. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Supriya Sule_Prajakt Tanpure
MLC Election : जागा भाजपला सुटल्याचे समजताच मंत्री गुलाबरावांची धावपळ; शिंदेंना भेटण्यासाठी रवाना, इकडे जळगावात वेगळ्याच चर्चा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "काल मला प्राजक्त तनपुरे भेटायला आले होते त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मला सांगितल्या. मी समजू शकते प्रत्येकाला अनेक अडचणी असतात. या अडचणींपैकी सगळ्याचं काही कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. त्यामुळं यावर फार काही बोलणार नाही. पण माझ्या तनपुरेंना शुभेच्छा आहेत"

Supriya Sule_Prajakt Tanpure
Prajakt Tanpure joins BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच राहुरीत मोठी हालचाल! तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

सुळे पुढे म्हणाल्या, काँग्रेसमुक्त भारत असं भाजपचे सगळे नेते म्हणायचे, पण अहिल्यानगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा. आज भाजपत केवळ राम शिंदे सोडले तर नगर जिल्ह्यातील त्यांचं नेतृत्व हे शंभर टक्के हे ओरिजिनल काँग्रेसचं आहे. म्हणजेच ज्या लोकांना नाकारुन काँग्रेसमुक्त भारत करायचा होता, ते सगळे अहिल्यानगरमधील नेते काँग्रेसचे माजी आमदार-खासदार सगळे भाजपत गेले आहेत. लोकांना बदल हवा होता पण काय बदललं? जी शंभर कुटुंब आधी काँग्रेसमध्ये होती तीच आता भाजपत आहेत. महाराष्ट्रात कुठली क्रांती घडली? ते कुठून लढतात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असतो. पण मला भाजपला विचारायचं होतं की, काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

Supriya Sule_Prajakt Tanpure
Parbhani-Hingoli MLC Election 2026 : पक्षांतर्गत विरोधानंतरही उमेदवारीसाठी माजी आमदाराचे राष्ट्रवादीशीही संधान? महायुतीत खळबळ

जो आपल्या विचारधारेचा आहे, जो भाजपचा कार्यकर्ता आहे. ज्यानं सतरंज्या उचलल्या, लाठ्या-काठ्या खाल्या त्यांनी संघर्ष केला तेव्हा भाजप विरोधीपक्षात होता पण आता ते कुठे गेले? सध्या प्रकाश जावडेकर कुठे गेले आहेत? त्यांनी लोकशाही मार्गानं आमच्यावर सातत्यानं कठोर टीका केली, ते सभागृहातही आक्रमकपणे बोलायचे. पण आता ते कुठे गेले आहेत? मला आता हळूहळू असं वाटायला लागलं आहे की आता विचारधारा राहिली आहे की नाही? मेरिट हा विषय राहिला आहे की नाही? अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर आपली भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com