Pune News : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनेच राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे.
सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्यस्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716, क वर्गातील 12250 आणि ड वर्गातील 15435 मिळून 29 हजार 443 सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरातील 828 आणि पुणे जिल्ह्यातील 2220 मिळून एकूण 3 हजार 48 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाच्या आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी या निवडणुकांच्या बाबतचे आदेश काढले आहेत.
त्यानुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्या सहकारी संस्था वगळून शासनाच्या आदेशानुसार इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या होती. त्या टप्प्यापासून 1 ऑक्टोबर 2024 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अ आणि ब वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2024 मधील तरतुदीनुसार तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होणे अपेक्षित आहे. त्याचवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियादेखील सुरुवात असल्याने एकाच वेळी या दोन निवडणुका होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजकीयदृष्ट्या राज्यात असणारे विधानसभा निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता या निवडणुका खरोखरच होतील का? याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.