Sharad Pawar-Supriya Sule-Ajit Pawar
Sharad Pawar-Supriya Sule-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

गोविंद बागेत दोन वर्षांच्या खंडानंतर भरणार दिवाळी पाडवा : पवार सकाळी आठपासून भेटणार!

सरकारनामा ब्यूरो

बारामती : गोविंद बागेत (Govind Bagh) दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या (ता. २६ ऑक्टोबर) दिवाळी पाडवा (Diwali) भरणार आहे. राज्यभरातील आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अधिकारीही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला येत असतात. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या भेटीची ओढ लागलेली असते, त्यामुळे गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याची कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता असते. कोरोना महमारीमुळे मागील दोन वर्षे दिवाळी पाडवा गोविंद बागेत आयोजित करण्यात आलेला नव्हता. (Organized Diwali Padwa after two years of hiatus at Govind Bagh)

दिवाळी पाडव्यानिमित्त उद्या (ता. २६ ऑक्टोबर) कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना भेटता येणार आहे. पवार हे सकाळी आठपासून दुपारी एकपर्यंत गोविंदबागेत नागरिकांना भेटणार आहेत. कोरोनामुळे एक वर्षे दिवाळी पाडवा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मागील वर्षी एका सभागृहात भरविण्यात आला होता. मात्र, कोरोनाचे संकट कमी झाल्याने यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर तो पुन्हा गोविंद बागेत आयोजित करण्यात आला आहे.

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील नागरिकांसह नेतेमंडळी गोविंद बागेत येत असतात. त्यानुसार यंदाही राज्यभरातील आमदार, खासदारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरीकही पवारांना भेटायला येणार आहेत. दरम्यान, प्रथेनुसार यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी (ता. २६ ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता श्री महावीर भवन येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

आगामी वर्षात काय उलाढाली होतील, हे वर्ष कसे असेल, पीकपाण्याची परिस्थिती कशी असणार, तसेच बाजारपेठेची स्थिती कशी असेल, आंतरराष्ट्रीय बाजार कसा असेल, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पवार व्यापाऱ्यांना करत असतात. त्यामुळे व्यापारी देखील या त्यांच्या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT