Murlidhar Mohol On Pahalgaam Terror Attack .jpg Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol: पहलगामचा हल्ला, मंत्री मोहोळ अन् त्यांच्या टीमनं रात्रीत सूत्रं फिरवली; पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबियांनाही सावरलं

Minister Murlidhar Mohol On Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुढील काही तास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पुण्यातील कार्यालयात ठाण मांडून होते. त्याकाळात ते आणि त्यांची टीमसह जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांच्या मदतीसाठी उभे ठाकल्याचे दिसून आलं.

Deepak Kulkarni

Pune News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22)दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 27 पर्यटकांचा जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला झाल्यानंतर पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय,नातेवाईक हे प्रचंड चिंतेत आहेत. राज्यातील काही पर्यटक अजूनही जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. याचदरम्यान,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह त्यांच्या टीमनं पहलगाममधील हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटक,त्यांच्या कुटुंबियांच्या सातत्यानं संपर्कात राहत त्यांना धीर दिल्याचं समोर आलं आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) माहिती मिळाल्यानंतर पुढील काही तास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पुण्यातील कार्यालयात ठाण मांडून होते. त्याकाळात ते आणि त्यांची टीम जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांच्या मदतीसाठी उभे ठाकल्याचे दिसून आलं.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कामाची दखल घेत सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या टीमच्या अविरत कामाची माहिती देण्यात आली आहे. मनीष पाडेकर यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टसह शेअर केलेल्या व्हिडिओत रात्री 11:55 वाजता जम्मूमध्ये अडकलेल्या एक कुटुंबासोबत मुरलीधर मोहोळ हे संवाद साधताना दिसून येत असल्याची माहिती मनीष पाडेकर यांनी दिली आहे. तसेच यावेळेपर्यंत मुरलीधर मोहोळ आणि त्यांची सर्व टीम साधारण पाच ते सहाजण यातला प्रत्येकाचा फोन हा दोनदा तीनदा चार्ज करून झाला होता. पण येणाऱ्या कॉलचा ओघ कमी झाला नसल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे

याचवेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना पुणे, महाराष्ट्रच नव्हे तर अगदी देशभरातून खूप फोन येत होते. आणि तेवढ्याच शांतपणे मंत्री मोहोळ आणि त्यांची टीम त्या फोन कॉलला उत्तर देत होते असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पाडेकर पोस्टमध्ये म्हणतात,मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतच्या लोकांबद्दल म्हणजे पूर्णवेळ जे काम बघतात, त्यांच्याबद्दल अनेकदा तक्रारी असतात.पण हल्ल्याच्या दिवशी मी खरंच स्वतः पाहिलं की, काय प्रेशरमध्ये विनोद सातव,आदित्य जोशी, अभिजीत मोडक,बापू मोहोळ,रमेश (पिट्या) परदेशी आणि ओंकार पिंगळे हे काम करतात.यानिमित्ताने त्यांच्या कामाला हॅट्स ऑफ असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुरलीधर मोहोळांच्या फोनवर काही लोकांनी पहलगाम,जम्मू काश्मीर येथून फोन लावले. यांपैकी अनेकांचा नंबर सेव्ह नसला तरी प्रत्येक फोन ते उचलत होते. याबाबत त्यांना विचारल्यावर त्यांनी आत्ता आपल्याला कोण कुठून कशासाठी फोन करत आहे हे माहीत नाही, यातला एक जरी फोन मिस झाला आणि तो फोन या अडकलेल्या लोकांपैकी कोणाचा असेल आणि जर तो न उचलल्यामुळे त्यांना मदत नाही झाली तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार असल्याची भावनाही मोहोळांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT