Dr. Shirish Valsangkar : वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळी झाडली; पण पिस्टल सापडले बेडरूममध्ये, ‘आय एम सॉरी...’ मनीषा मानेच्या माफीनाम्यात काय म्हटलंय?

Solapur Crime News : डॉक्टरांनी बाथरूममध्ये गोळीबार करून आत्महत्या केली तर त्यांचे पिस्टल बेडरुममध्ये कसे आले? ते कोणी आणून ठेवले का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 April : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी बाथरूमध्ये स्वतःवर गोळ्या झाडल्या. मात्र, त्यांचे पिस्टल बेडरुमध्ये आढळले आहे. तसेच, डॉक्टरांच्या आत्हमत्येप्रकरणी अटकेत असलेली हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने दिलेला माफीनामाही बेडरूममध्येच सापडला आहे, त्यामुळे डॉक्टरांचे पिस्टल सापडले बेडरूमध्ये कोणी आणले?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, मनीषा मुसळे माने हिची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोलापूर (Solapur) न्यायालयाने दिला आहे. मात्र, वळसंगकरांच्या आत्महत्येच्या आधी घडलेल्या घटनेवर मुळसे माने हिने मेल करून माफीनामा दिला होता. त्यात नेमकं काय म्हटलं आहे, याबाबत उत्सुकता आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या घरातून पोलिसांनी काही वस्तू जप्त केलेल्या आहेत. ज्या पिस्टलमधून डॉक्टरांनी आत्महत्या केली, ते पिस्टल त्यांच्या बेडरूममधून जप्त केल्याची नोंद पोलिस तपासात उघड झाले आहे. डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूममध्ये एक जिवंत काडतूस, एक पुंगळी, टॉवेल, नॅपकिन, एका बुलेटमधील शिसे, बुलेटवरील तांब्याचे आवरण अशा वस्तू सापडल्या आहेत. हे सर्व बाथरूमध्ये सापडलेले असताना त्यांनी ज्या पिस्टलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली, ते पिस्टल बेडरूमध्ये सापडले आहे.

डॉक्टरांनी बाथरूमध्ये गोळीबार करून आत्महत्या केली तर त्यांचे पिस्टल बेडरुममध्ये कसे आले? ते कोणी आणून ठेवले का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिसांनी ते पिस्टल डॉक्टरांच्या बेडरूमधून जप्त केले आहे. तशी नोंद पोलिस डायरीत आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या आत्महत्येबाबत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत.

Dr. Shirish Valsangkar
Satara BJP Politic's : सातारा भाजप जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंतांना संधी की नव्यांचा राज्यभिषेक?; उदयनराजेंच्या निकटवर्तीयासह ही नावे आघाडीवर...

एकीकडे पिस्टल बेडरूममध्ये सापडले, त्याच बेडरूमध्ये हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिने दिलेला माफीनामाही सापडला आहे. पिस्टल आणि माफीनामा बेडरूमध्ये सापडलेले असताना त्यांनी लिहिलेली चिठ्ठी मात्र डॉक्टरांच्या खिशात आढळून आली आहे, त्यामुळे वळसंगकर यांच्या आत्महत्येबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

डॉक्टर वळसंगकर यांच्या बेडरुममध्ये पोलिसांना पिस्टलसोबत एक पेनड्राईव्ह आणि दोन मोबाईलही आढळून आलेले आहेत. पोलिसांनी अजूनही त्या गोष्टींकडे आपला तपास वळविलेले नाहीत. त्या सर्व वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar : दीड वर्षापूर्वी एका डॉक्टरांसंदर्भात घेतलेला निर्णय डॉ अश्विन वळसंगकरांनी आपल्याच वडिलांबाबत का घेतला नाही?

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या अगोदर प्रशासकीय अधिकारी मनीषा मुळे-माने हिने डॉक्टरांना धमकीचा मेल केला होता. त्यानंतर तिला हास्पिटलमध्ये बोलावून समज देण्यात आली होती. त्या वेळी तिने डॉक्टरांसह कुटुंबीयांची माफी मागितली होती. त्यानंतर तिने डॉक्टरांना मेल करून एक माफीनामा पाठविला होता. त्यात तिने ‘आय एम सॉरी, व्हॉट आय एम रिटन इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिर्स्टबन्स प्लीज फॉरगिव मी. आय एम अगेन अगेन सॉरी सर’ असे लिहून खाली इंग्रजीत सही केलेली आहे. तो माफीनामा डॉ. शिरीष यांच्या खिशात नव्हे; तर त्यांच्या बेडरुममध्ये आढळला असल्याचे पोलिसांनी तपासात नोंदविलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com