Sharad Pawar 2 Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : कमतरता राहिली म्हणून हल्ला झाला, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांनी मान्य केलं! शरद पवारांनी थेटच सांगितलं

Pahalgam security breach : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी सुरक्षिततेत कमतरता राहिल्याचं केंद्रीतील मोदी सरकारने बैठकीत मान्य केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

Sudesh Mitkar

Pune News : पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुठेतरी आमची कमतरता राहिली, अशी कबुली दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं .

पुणे (Pune) जिल्ह्यातील सासवड इथं आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, "देशाचा सध्याचा काळ अडचणीचा आहे. गेले दोन दिवस पहलगाम बाबतच्या बातम्या ऐकत आहोत. अतिरेक हल्ला झाला त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला, हा देशासाठी मोठा धक्का आहे. हा कोणत्या जाती धर्मावर धक्का नव्हता, तर भारतावर धक्का होता. हा कोणत्या धर्मावर नाही, तर देशवासियांवर हल्ला होता. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारे देशवासियांवर हल्ला होतो, तेव्हा राजकारण आणि मत भिन्नता बाजूला ठेवून देश एकत्र होतो".

सरकारच्या याबाबत काही चुका असतील, तर त्या नंतर काढूयात. मात्र सध्या आतंकवादी हल्ला विरोधात देश एकत्र आहे, हे महत्त्वाचं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे, त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा झाली आणि मला एक गोष्टीचा समाधान आहे .या बैठकीमध्ये जे नेतृत्व करणारे लोक होते, देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की, कुठेतरी आमच्याकडून कमतरता झाली. कुठेतरी कमतरता झाली, ही गोष्ट त्यांनी मान्य केली असली, तरी त्या कमतरतेवर आज चर्चा केली जाणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

आज चर्चाही या कुटुंबावर जे हल्ले झाले, त्यांच्यामध्ये विश्वासाचं वातावरण कसं तयार करता येईल, यावर झाली पाहिजे. या हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये असलेल्या अनेक सहकाऱ्यांना आणि मित्रांना मी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं की कश्मीरमधील लोकांना जो हल्ला झाला तो अजिबात पटलेला नाही. तेथील लोक याच्या विरोधात आहेत. त्यामुळेच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी हजारो काश्मीरमधील लोक रस्त्यावर आले. त्यामध्ये 80% मुसलमान होते त्यांनी या दहशतवादाचा निषेध आणि विरोध केला आणि आम्ही सर्व एक आहोत हा संदेश दिला, असेही शरद पवार यांनी म्हटले्.

सुप्रिया अन् उमर यांचा एकत्र शिक्षण

तेथील मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आम्ही हे सहन करणार नसल्याचे सांगितले आहे. उमर अब्दुल्ला यांचे वडील फारूक अब्दुल्ला हे माझे मित्र आहेत. जेव्हा कश्मीरमधील परिस्थिती वाईट होती, त्या ठिकाणी शिक्षण घेण अवघड होतं. त्यावेळेस फारूक अब्दुल्ला यांनी मला फोन करून उमर अब्दुल्ला यांच्या शिक्षणाबाबत विचारणा केली! त्यानंतर उमर अब्दुल्ला आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित शिक्षण घेतल्याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

उमर अब्दुल्ला यांच्या कुटुंबात अस्वस्थता

उमर अब्दुल्ला यांचं ग्रॅज्युएशनच्या शिक्षण माझ्या मुंबई इथल्या घरामध्ये राहून झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या हल्ल्यानंतर अतिशय अस्वस्थ असल्याचं जाणवलं. काही लोक या हल्ल्यानंतर या प्रकाराला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे देशाच्या दृष्टीकोनातून अत्यंत नुकसान करणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT