Pahalgam terrorist attack Sarkarnama
पुणे

Pahalgam terrorist attack : फिरायला गेले ते परतलेच नाहीत! दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 पुणेकरांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

Kashmir Tourist Killings : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.

Jagdish Patil

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारत जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता मृतांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

काल रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता जखमी असलेल्या आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेले दोन्ही पर्यटक पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील (Pune) जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय हे काश्मीरला गेले होते.

हे सर्व पहलगामध्ये असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना त्यांचा धर्म कोणता विचारला, त्यानंतर ते मुस्लिम नाही समजताच त्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गंभीर जखमी झाले होते.

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील पर्यटकांसह दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले असं मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात दाखल

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. ते बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT