Pankaja Munde- BJP Politics:  Sarkarnama
पुणे

Pankaja Munde- BJP Politics: 'पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला बळ मिळाल्याचं लवकरच दिसेल'; भाजप नेत्याचं मोठं विधान

अनुराधा धावडे

Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde: "पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करु शकत नाहीत."अशा शब्दातं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. भाजपमध्ये त्यांना डावललं जात असल्याने अनेकदा त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या चाहत्यांकडूनही अनेकदा तशा तक्रारी केल्या जातात.

बावनकुळे यांनी नुकतीच 'सरकारनामा' ला मुलाखत दिली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासारखं मराठवाड्यातील नेतृत्त्व बाजूला ठेवलं जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. असं सर्वसामान्य मतदारांचं म्हणणं आहे. या प्रश्नावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंंकजा मुंडे यांच्याबाबत मी अत्यंत जबाबदारीने हे बोलत आहे. पंकजाताई माझ्यापेक्षाही क्षमतावान आहेत. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. मध्यप्रदेशच्या प्रभारी आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात मराठवाड्यात निवडणुका होणार आहेत. त्यांच्याबाबत पक्षाची भूमिका ठरली आहे, काही लोकांना पंकजा मुंडेंबद्दल सोशल मिडीयात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बावनकुळे म्हणाले, "मला वाटतं पंकजाताईंच्या नेतृत्त्वाला बळ देणे, त्यांना शक्ती देणे हे नक्कीचं केंद्रीय नेतृत्त्व करणार आहे. केंद्रीय नेतृत्त्व त्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी आहेत. देवेद्रंजींनी कायम त्यांना पाठींबा दिला. पब्लिकली त्यांना ताकद दिली. लवकरच पंकजा ताईंच्या नेतृत्त्वाला बळ मिळाल्याचं लवकरच तुम्हाला दिसेल. मलाही अडीच वर्षे कोणतही पद दिलं नव्हतं. त्यामुळे काही काळ लागेल. पंकजाताईंचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचं नेतृत्त्व आम्हाला मान्य आहे. त्यांच्यासारखं नेतृत्त्व आमच्या भाजपमध्ये (BJP) आहे.''

इतर पक्षांकडून पंकजाताईंना (Pankaja Munde News) ऑफर दिल्या जात आहेत, या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करु शकत नाहीत. त्यांना नाही पटलं तर त्या घरी बसतील पण त्या कधीही, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाहीत. त्या अत्यंत प्रगल्भ नेत्या आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना ज्या पद्धतीने घडवलं आहे. त्या कधीही कमळ आणि भाजपच्या विचारधारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व सोडून जाऊ शकत नाही,'' असही बावनकुळे यांनी यावेळी नमुद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT