Patra chawl Scam Update : पत्राचाळ प्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तूर्तास दिलासा....

Sanjay Raut News : सध्या संजय राऊत जामिनावर बाहेर आहेत.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाचे धडाडती तोफ व खासदार संजय राऊत हे शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली होती. तसेच त्यांनी १०४ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. याचवेळी राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तूर्तास दिलासा दिला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात पत्राचाळ घोटाळा प्रकरणी( Patra chawl Scam ) मंगळवारी(दि.२०) सुनावणी पार पडली. या सुनावणीला पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टात उपस्थित होते. या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

MP Sanjay Raut
BJP Minister on Shivsena : भाजप मंत्र्याचे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना खडेबोल; म्हणाले "टीआरपीचा खेळ..."

पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं 14 जुलैपर्यंत तहकूब करण्यात केली. यादरम्यान, आरोपी बनवण्यात आलेल्या गुरू आशिष या कंपनीच्यावतीनं कोणीही कोर्टात हजर करण्यात आलं नव्हतं. यावरुन मुंबई सत्र न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणील खटल्याच्या नियमित सुनावणी करता मंगळवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर होते. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुरू असलेला हा खटला सध्या आरोपनिश्चितीच्या टप्यावर आहे. मात्र जोपर्यंत सर्व आरोपी कोर्टापुढे हजर होत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. एनसीएलटीच्या भूमिकेची नोंद घेत तूर्तास मुंबई सत्र न्यायालयानं खटल्याची सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

MP Sanjay Raut
Darshana Pawar Death Case: दर्शनाचा खून झाल्याचा संशय;मित्र हंडोरे बेपत्ता, पोलीस मागावर

काय आहे आरोप?

पत्राचाळ जमीन घोटाळा एक हजार ३४ कोटी रुपयांचा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला असा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पत्राचाळ प्रकरणातील आरोपींनी प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूंना, तरउर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, २०१० मध्ये राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले.

MP Sanjay Raut
Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis: 'मी अर्धवटराव तर मग फडणवीस दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का?'; उद्वव ठाकरेंचा पलटवार पलटवार

यानंतर २०११, २०१२ तसेच २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आल्याचं ठपका तपासयंत्रणांनी ठेवला आहे. या प्रकरणात प्रवीण राऊत आणि वाधवान यांनी गुरूआशिष आणि एचडीआयएलच्या माध्यमातून 1 हजार 34 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडी(ED)चा आरोप आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com