Pankaja Munde, Dhananjay Munde sarkarnama
पुणे

पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे यांचा ट्वीटरवरही सामना

अमोल जायभाये

Pankaja Munde : पुणे : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. धनंजय यांनी परळी विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरु रंगलेला असतो. मात्र, सध्या या दोघांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होता आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राज्यभरात समर्थक आहेत. हे दोन्ही नेते सोशल मीडियावर नियमतीत सक्रीय असतात. त्यांच्या पोस्टला लगेच लाईक्स मिळतात. त्यांचे समर्थक त्यांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर्स करत असतात. पंकजा मुंडे यांचे फॉलोवर सुमारे सात लाख पन्नास हजार आहेत. तर धनंजय मुंडे यांचे फॉलोवर आठ लाख 50 हजार आहेत. आता यावरूनही मुंडे भावा-बहिणीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगत असते.

पंकजा आणि धनंजय यांनी एकाच वेळी ट्वीटवरील प्रोफाईल फोटो बदले आहेत. त्यामुळे सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा रंगली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा येथेही सामना रंगल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. पंकजा यांच्या प्रोफाईल फोटोला त्यांच्या समर्थकांनी दाद दिली आहे. त्यांच्या फोटोला चार तासात जवळपास ७ हजार लाईक्स मिळाल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांनी फोटो शेअर आणि कमेंन्ट करत भर भरून दाद दिली आहे.

तसेच धनंजय यांच्या फोटोलाही दोन हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोलाही जोरदार लाईक्स आणि शेअर केले आहे. त्यावर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रणात कमेंन्ट ही केल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते नियमीत राजकीय मैदात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत असतात. बीड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो. तसाच काहीचा प्रत्येय आज ट्वीटरवरही आला. दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी बदलेले प्रोफाईल हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT