Pankaja Munde Sarkarnama
पुणे

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी खडकवासला मतदारसंघात घेतली बैठक; जागा वाटपाबाबत मोठं विधान, म्हणाल्या...

Pune BJP and Vidhansabha Election : काही नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आल्याने, पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे.

सागर आव्हाड

Pankaja Munde Khadakwasla Assembly Constituency Meeting : खडकवासला मतदार संघाच्या भाजपच्या बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या बैठकीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह मतदारसंघातील भाजपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची अनुपस्थिती होती. शिवाय काही नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आल्याने, पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आल्याचे दिसत आहे.

या बैठकीनंतर पंकजा मुडेंनी सांगितले की, जागा वाटपाबाबत काही जागा ठेवल्या जातील बाकी जागांचा निर्णय होईल. महायुतीचं जागा वाटप प्रमुख नेते ठरवतील. दिल्लीतील काही नेते सर्वेक्षण झाल्यानंतर याचा निर्णय घेतील, काही जागा वेगळ्या कारणासाठी ठेवल्या जातील. तसेच, जागा वाटपाबाबत बोलताना हा अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे. थोडा वेळ या सर्व गोष्टींसाठी द्यावा लागेल. असं म्हणत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी जागा वाटपात केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली

याशिवाय पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी मराठा आरक्षण बाबत बोलताना म्हटलं की, आरक्षण मिळालं नाही याला महाविकास आघाडी जबाबदार आहे. तसेच माझ्या बैठकीत जे मी बोलले तो अंतर्गत विषय आहे. विरोधक फेक नरेटिव्ह तयार करतात जसे लोकसभेत झाले. फेक नरेटिव्हची चर्चा विरोधक करत आहेत.

तर मराठा ओबीसी आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का हेही पाहावं लागेल त्यासाठी तिसऱ्या आघाडीला थोडा वेळ देवूया, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.

उमेदवारी मागताना माझ्या नावाची बदनामी करू नये - आमदार तापकीर

यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर(MLA Bhimrao Tapkir) यांनी पक्षश्रेष्ठसमोर खंत व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागताना माझ्या नावाची बदनामी करू नये. आपली रेष कशी मोठी होईल हे बघितलं पाहिजे, दुसऱ्याची रेष कमी करू नका. लोकशाहीत सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे. तिकीट मागणी करताना चांगल्या पद्धतीने केली पाहिजे लोकांची बदनामी होता कामा नये.' असं तापकीर यांनी सुनावलं.

नरे गावच्या सरपंचांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर ठेवलं बोट? -

तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत नरे गावच्या सरपंचांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्याचं दिसून आलं. सागर भुमकर असं सरपंचाचं नाव असून, त्यांनी आपलाच पक्ष जाणून-बुजून निवडणुका पुढे ढकलत असल्याचे लोकांना वाटत, असल्याचं बोलून दाखवलं. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत निवडणुका पुढे ढकलत आहे, असं लोकांना वाटत असल्याचं सांगितलं.

तसेच 'महानगरपालिकेपासून देशात सरकार आपला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी काम ऐकत नाहीत. जर इलेक्शनच लागणार नाहीत हे प्रत्येक इच्छुकाला माहित आहे. फक्त तुमच्यासमोर इथे बसलेले प्रत्येक जण माना हलवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला लावा. अशी पंकजा मुंडे समोर सरपंच भुमकर यांनी मागणी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT