Pune News : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये सीआयडीने न्यायालयात तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्या हत्या प्रकरणात थेट वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. कराडला केज येथील खंडणीच्या गुन्हाअंतर्गत अटक करण्यात आली होती. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येचा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे दोषारोपपत्रात सांगितले आहे, यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.
पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी पत्रकारांनी सीआयडी कडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रामध्ये वाल्मिक कराड याचा उल्लेख असल्याबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या, 'याबाबत कोणतीही माहिती मला नाही. सीआयडीचा दोषारोप पत्र हा कॉन्फिडेन्शियल विषय असून सीआयडीकडून याबाबत ऑफिशियल माहिती जेव्हा येईल तेव्हाच याबाबत मी भाषा करेल. याबाबत गृहमंत्रालयाला माहिती असेल मला याबाबत माहिती नाही'
बीडच्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारला असता 'तो विषय आता मागे पडला आहे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला तो प्रश्न विचारा मी पुण्यात आलेली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात.?' असे म्हणत पंकजा मुंडे चिडल्या.
पंकजा मुंडे पुढे म्हणल्या की, 'देशमुख यांच्या हत्याबाबत तीव्र निषेध आणि तसेच या प्रकरणाची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू . घटना घडल्यापासून मी त्यावर बोलत आहे. 12 डिसेंबरचं माझं भाषण काढलं तर त्यामध्ये 90% मी त्याबाबतच बोलले आहे . आता त्याच्या आतल्या बाबींवर बोलण्याचा औचित्य नाही आणि मला माहिती देखील नाही.'
'मी गृह खात्याशी संबंधित नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती देणे योग्य आहे. ते जी काही माहिती द्यायची ती कोर्टाला देतील. त्यानंतर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. आणि माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी याबाबत एकदा शब्द दिल्यानंतर त्यांच्या टीम मधील एक मंत्री म्हणून मी वारंवार याबाबत भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेस नाही.
संवेदनशीलपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे हे माझे एक हजार एकवेळा बोलून झालेला आहे.', असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.