Parth Pawar latest news: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर गुढीपाडव्याला अजित पवारांची आठवण काढत भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मागील काही वर्षांतील अजित पवार यांच्यासोबत साजऱ्या केलेल्या गुढीपाडव्याचे फोटो पोस्ट करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना उलटल्यानंतर देखील विविध माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळताना पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे सातत्याने आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी सोशल मीडिया वरती शेअर करताना पाहायला मिळाले आहेत.
आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी देखील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मागील काही वर्षातील अजित पवार सोबतच्या साजरे केलेल्या गुढीपाडव्याचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिसत आहेत. यातील एक फोटो कोविड काळातील आहेत.
पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाच्या छायेखाली करतो. या गुढीपाडव्याला आम्ही दादांना प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्मरतो. त्यांचे मार्गदर्शन आणि मूल्ये आजही आम्हाला दिशा दाखवत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाच्या छायेखाली करतो."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.