Anand ParanjpeOn Rohit Pawar : "रोहित पवारांचं राजकारण दुर्दैवीच!" अजितदादांना एकटं पाडलं, महाराष्ट्र विसरलेला नाही; आनंद परांजपे यांचा घणाघात

NCP Anand Paranjpe Slams Rohit Pawar Over Ajit Pawar Plane Crash Politics : अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा रोहित पवार यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे.
Anand ParanjpeOn Rohit Pawar
Anand ParanjpeOn Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : "अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार करत असलेले राजकारण, आरोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

अपघातामागील सत्य काय आहे, हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे, अशी पहिल्यापासून राष्ट्रवादीची भूमिका आहे," अशा शब्दात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

आनंद परांजपे म्हणाले, "अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना आज पूर्ण झाला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास होत नाही की, अजितदादा आमच्यात नाही. पण रोहित पवार या दुर्दैवी मृत्यूवर करत असलेले राजकारण अन् आरोप ही काही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही. अपघाताच्या पहिल्या दिवशी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री के. रामा नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोतर्फे (एएआईबी) यांची चौकशी घोषणा केली. तशी चौकशी सुरू आहे.

तसंच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत भेटल्या. त्यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवार देखील उपस्थित होते. या अपघाताची चौकशी होईल आणि सत्य महाराष्ट्र समोर येईल, या दोन नेत्यांनी आश्वस्त केलेलं आहे. 'सीआयडीची' चौकशी सुरू असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून 'सीबीआय'मार्फत चौकशीची मागणी आणि त्यावर त्यांची भूमिका देखील समोर आली आहे, याकडे आनंद परांजपे यांनी लक्ष वेधलं.

Anand ParanjpeOn Rohit Pawar
Madhi Yatra controversy : मढी यात्रेत धर्माचा ट्विस्ट? मुस्लिमांना दुकानं, प्रशासनच उद्योग करतंय; सरपंचांनी तापवलं वातावरण

'दुर्दैवाने जे काही राजकारण आमदार रोहित पवार गेले काही दिवस करत आहेत, मग तो 'एफआयआर' दाखल करण्यासाठी मरीन लाईन पोलिस ठाण्यामध्ये केलेला तमाशा असेल, बारामती पोलिस ठाण्यामध्ये केलेला तमाशा असेल, यानंतर मुख्यमंत्र्यांची देखील त्यांनी भेट घेतली. तिथं मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून एफआयआर नोंदवली जाईल, असं आश्वस्त केलं. यानंतर देखील त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी 'एफआयआर'बाबत आश्वस्त करून देखील, सांगून देखील रोहित पवार यांनी सुरू केलेलं राजकारण थांबवावं,' असं आनंद परांजपे यांनी सुनावलं.

Anand ParanjpeOn Rohit Pawar
Delhi Liquor Policy Scam : बहुचर्चित मद्यधोरण घोटाळा? केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह, के. कविता, किती दिवस होते तुरुंगात

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नेते-चार नेते, असा आरोप ते करत आहेत. दोन जुलै 2023 रोजी अजितदादांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर, त्यांना कुटुंबानं कसं एकटं पाडलं, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आमचे उमेदवार सुनेत्राताई पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातल्या पवारांना मतदान करा, अशा प्रकारचं वरिष्ठांकडून वक्तव्य केलं गेलं,' याकडे आनंद परांजपे यांनी लक्ष वेधलं.

विधानसभेच्या वेळेला देखील, अत्यंत हताश होऊन तो व्हिडिओ अजय सगळ्यांकडे आहे, अजितदादांनी भाषणामध्ये बोलतात की, कुटुंबांना मला एकटा पाडलंय. पण बारामती जनता मला एकट पाडणार नाही, ही उद्विग्नवता त्यांच्या भाषणामध्ये दिसत होती. त्यामुळे आज जे काही त्यांच्या मृत्यूवर राजकारण केलं जातंय ते अत्यंत चुकीचा आहे, असा घणाघात आनंद परांजपे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com