Dilip Mohite on Bullock cart Owners :
Dilip Mohite on Bullock cart Owners : Sarkarnama
पुणे

Dilip Mohite on Bailgada Malak: बैलगाड्यामागे फिरणाऱ्या पोरांना शिकू द्या; अन्यथा त्यांना कुणी मुली देणार नाही, खेडच्या आमदारांनी टोचले कान !

रोहिदास गाडगे

Dilip Mohite Patil on Bullock Cart Owners: बैलगाडा शर्यत हा शेतक-याचा खानदानी शौक असला तरी तुमच्या मुलांना शिकू द्या, कमी शिकलेल्या मुलांना अलीकडे कोणी मुली देत नाही आणि मुलीही अशा मुलांना पसंत करत नाही, अशा शब्दांत आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी बैलगाडा मालकांना कानपिचक्या दिल्या आहेत.खेडमध्ये आयोजित आमदार केसरी २०२३ बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Pay attention to the education of children running behind Bailgada)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील सर्व याचिका फेटाळून लावत बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा होऊ लागल्या आहेत. पण या बैलगाडा शर्यतीमुळे अनेक मुलांनी शिक्षण सोडून या बैलगाड्यांच्या मागे धावत असल्याची एक धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमातच या वास्तवावर भाष्य करत थेट गाडामालकांचाही समाचार घेतला आहे.

काय म्हणाले दिलीप मोहिते-पाटील?

बैलगाडा हा शेतकऱ्यांचा खानदानी शौक आहे. पण परवा माझ्याकडे काही शिक्षक आले होते. त्यांनी मला सांगितलं की, कित्येक मुलं दहावीच्या परीक्षेलाच बसली नाहीत. आठवी-नववीची मुलं शाळेत येत नाहीत. रोज कुठे ना कुठे बैलगाडे असतात. कृपा करुन आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याचीही दक्षता घ्या.

कारण अलीकडच्या काळात न शिकलेल्या मुलांना कोणी मुली देत नाही आणि मुलीही अशा मुलांना पसंत करत नाहीत. जर बैलगाडीचं क्वालिफिकेशन सांगितलं तर मुली मिळतील याची गॅरंटीही नाही. त्यामुळे आपली मुलं शिकली पाहिजेत, कामाधंद्याला लागली पाहिजे, आणि ते करुन त्यांनी बैलगाडाही पळवला पाहिजे, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. (Bullock Cart Race News)

बैलगाडा मालकांनीही आपल्यासोबत जो मुलगा बैलगाडा पळवण्यासाठी शाळा बुडवून येत असेल तर याचा दोष आपला असेल, याची दक्षता घ्या. इतकचं नाही तर काही मुलांना चुकीच्या सवयीही लागल्या आहेत. हे शिक्षकांनीच मला सांगितलं आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळू देऊ नका, बैलगाड्याला विरोध कोणालाही नाही, पण आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होऊ नये याचीही काळजी घ्यायची आहे. शौक करा पण त्याचा अतिरेक होणार नाही, याचीही काळजी घ्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT