PCMC Mayor Mai Dhore  
पुणे

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड : महापालिका 50 हजार ते 2 लाखांपर्यंत देणार बोनस

कोरोना संकटाच्या काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेने यावर्षी अधिकारी व कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : कोरोना संकटाच्या काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) यावर्षी अधिकारी व कर्मचा-यांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर केला आहे. विशेष म्हणजे बोनस कमी केलेला नसून, त्यातील बक्षीसाची रक्कम पाच हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. बोनस म्हणून एक पगार (८.३३टक्के) सानुग्रह अनुदान व वीस हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला किमान पन्नास हजार तर अधिकाऱ्याला दोन लाख रुपये बोनस मिळणार आहे. बोनस जाहीर करणारी पिंपरी राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

कोरोना संकटामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याची ओरड सुरू आहे. श्रीमंत महापालिकेचे बिरुद लावणारी पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र, याला अपवाद ठरली आहे. कोरोना संकटामुळे आधीच कटवट दिवस आलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

महापालिकेने यावर्षी बक्षीसाच्या रकमेत पाच हजाराने वाढ केली आहे. तसेच ८.३३ टक्के आणि वीस हजार रुपये बक्षीस पाच वर्षे मिळणार आहे. तसा करार काल (ता.२७) सायंकाळी महापालिका प्रशासन,पदाधिकारी आणि कर्मचारी महासंघ म्हणजे महापालिका कर्मचाऱी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. त्याची घोषणा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज केली.

या वेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील, तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते. सात हजार ३२६ कर्मचाऱी व अधिकाऱ्यांना हा पन्नास कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. त्यासाठी श्रीमंत पिंपरी महापालिकेने ५५ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT