सिद्धूंनी राजीनामा देताच नवीन मुख्यमंत्री म्हणाले, माझा काहीच संबंध नाही!

नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. यावर अखेर नवीन मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आपली बाजू मांडली आहे.
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिद्धू हे नवीन मंत्रिमंडळ स्थापनेवरुन पक्षावर नाराज असल्याचे समजते. यावर अखेर नवीन मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आपली बाजू मांडली आहे.

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी दोन ओळीच्या राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील नवीन मंत्रिमंडळाची स्थापना करताना सिद्धूंना विचारात घेतले गेले नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यांचा सल्ला डावलण्यात आला आणि काही प्रकरणात त्यांना अंधारात ठेवण्यात आले, असेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे मुख्यमत्री चन्नी यांना धक्का बसला आहे. ते म्हणाले की, सिद्धू हे नाराज असल्यास त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. ते माझ्यावर नाराज नाहीत.

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
काँग्रेसला मोठा धक्का! सिद्धूंचा प्रदेशाध्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
सिद्धूंच्या राजीनाम्याने अमरिंदरसिंगांची भविष्यवाणी ठरली खरी

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलली होती. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष पक्षाने दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com