PCMC Mahesh Landge .jpg Sarkarnama
पुणे

Mahesh Landge News: PCMC चा 'टीपी स्किम'बाबत मोठा निर्णय; भाजप आमदार महेश लांडगेंच्या लढ्याला यश

Mahesh Landge Politics: चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

Deepak Kulkarni

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने चिखली- कुदळवाडीतील प्रस्तावित TP स्किम कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मागणीला यश मिळाले असून, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे.

चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मंगळवारी(ता.15 मे ) प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सभेला मान्यता दिली आहे.

प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सभेला मान्यता दिली आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराच्या स्थापनेपासून 3 ते 4 वेळा आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. 1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करुन आमचा विरोध असतानाही जमिनी ताब्यात घेतल्या. टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा आमच्या जमिनींवर भूसंपादनाची कारवाई केली. प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या भागात टीपी स्कीम लागू नये, अशी आग्रही भूमिका प्रशासनासमोर मांडली. त्याला यश मिळाले आहे.

चऱ्होलीबाबत भूमिपुत्रांसाठी लढणार!

चिखलीतील प्रस्तावित TP Scheme प्रशासनाने रद्द केली. मात्र, अद्याप चऱ्होलीतील प्रस्तावित TP Scheme बाबत निर्णय झालेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ग्रामस्थ, भूमिपुत्र यांची बाजू ऐकूण घेणार आहेत. त्यासाठी आयुक्त- ग्रामस्थ यांची श्री वाघेश्वर महाराज मंदिरात लवकरच बैठक घेण्यात येईल.

भूमिपुत्रांचा TP Scheme ला का विरोध आहे? याबाबत सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवूनच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, चऱ्होलीची TP Scheme सुद्धा चिखली-कुदळवाडीप्रमाणे रद्द करावी, अशी आमची ठाम मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

याबाबत भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले, चिखली-कुदळवाडीचा TP Scheme रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांचे आभार व्यक्त करतो. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. याच धर्तीवर आता चऱ्होलीची TP Scheme संदर्भातील प्रक्रियाही रद्द करावी. कारण, भूमिपुत्रांचा या स्कीमला विरोध आहे.

संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) आगामी तीन महिन्यांत अंतिम होईल. त्यामुळे चऱ्होलीसाठी नवीन TP Scheme आवश्यकता नाही, अशी माझी भूमिका आहे. लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक, जागामालक, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध असल्याचेही लांडगे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT