Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर परिवहन विभागाचा सर्वात मोठा निर्णय; मंत्री सरनाईकांनी दिली माहिती

ST Department Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्वारगेट अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक तपास करण्याचे आदेशही दिले होते. तसेच आता परिवहन विभागानेही कठोर पावले उचलली आहेत.
Swargate rape case
Swargate rape caseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पुणे शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. यामुळे आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं होतं. तसेच राज्यातील महिलांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. याचदरम्यान,महायुती सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतला आहे.

परिवहन विभागानं नव्या 3 हजार बसेसची खरेदी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बसबांधणी कंपन्यांनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. याचबैठकीत सरनाईकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसह नव्या बसेसमधील अत्याधुनिक व्यवस्थेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कुठलाही अनुचित घटना घडू नये यासाठी परिवहन विभागाकडून सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याद्वारे आता बसचालकाच्या ड्रायव्हिंगवरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेच्या धर्तीवर बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

Swargate rape case
Bhushan Gavai On Narayan Rane: सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांतच गवईंचा पहिलाच मोठा निर्णय; नारायण राणेंना झटका

तसेच भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बससेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेसची खरेदी करण्यात येणार आहेत. याचवेळी नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ए.आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे,जी.पी.एस.तंत्रज्ञान एल.ई.डी, टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा,याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस-लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीनं बसविण्यात येणार असल्याचंही मंत्री सरनाईक म्हणाले.

परिवहन विभागानं खरेदी केलेल्या नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एल.ई.डी.टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातींबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान,मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे बस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असेल अशी ग्वाही दिली आहे.

Swargate rape case
Uddhav Thackeray : तब्बल 35 वर्षे जळगावचं राजकारण कोळून पिलेल्या नेत्यानं सोडलेली साथ ; उद्धव ठाकरेंना यंदा पालिकेचा गड सोपा नसणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्वारगेट अत्याचार (Swargate Rape Case) प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले होते. तसेच याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील कठोर पावले उचलली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com