ज्ञानेश्वर भंडारे
PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोठे फेरबदल केले आहेत. एकाच वेळी तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.नव्याने स्थापन होणाऱ्या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या अंमलबजावणीपूर्वी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, सध्याच्या आठ प्रभाग समित्यांबी पुनर्रचना करून दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. ही नवी रचना १ जुलैपासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. त्यानुसार विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना नव्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
नव्या रचनेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये 'अ' क्षेत्रीय कार्यालय राजगड, 'व'-सिंहगड, 'क' विजयदुर्ग, 'ड' देवगिरी, 'हैं'-शिवनेरी,'फ' तोरणा, 'ग' पुरंदर, 'ह' प्रतापगड, 'ज'-रायगड आणि 'ल' लोहगड अशी नावे देण्यात आली आहेत.
नवीन 'ज' म्हणजेच रायगड क्षेत्रीय कार्यालय ताथवडे येथील महापालिकेच्या वाहनतळ भवनात कार्यरत राहणार आहे. तर 'ल' म्हणजेच लोहगड क्षेत्रीय कार्यालय संत तुकारामनगर पोलिस ठाण्यासमोरील म्हाडा इमारतीच्या गाळ्यात सुरू करण्यात येणार आहे. या पुनर्रचनेमुळे क्षेत्रीय स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम होईल, नागरिकांना सेवा जलद मिळतोल आणि विभागनिहाय जबाबदाऱ्यास्पष्ट होतील, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
या निर्णयाने क्षेत्रीय कार्यालये, तांत्रिक विभाग आणि प्रशासकीय शाखांच्या कामकाजाच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत.
महापालिकेच्या नव्या क्षेत्रीय रचनेनुसार एकूण २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७५ कनिष्ठ अभियंते, ३६ उपअभियंते, १०३ लिपिक आणि ५८ मुख्य लिपिकांचा समावेश आहे. यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजात मोठा बदल होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.